आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तापी’ वाहिनीच्या कामास आजपासून सुरुवात; तुर्कमेनिस्तान-अफगाण- पाक- भारत गॅस प्रकल्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षेत असलेल्या व तुर्कमेनिस्तान-अफगाणिस्तान- पाकिस्तान-भारत यांच्यासाठी महत्त्वाच्या वीज वाहिनी प्रकल्पाच्या कामाला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. प्रकल्पांतर्गत १ हजार ६८० किलोमीटर लांबीची गॅस वाहिनी सुरू होणार आहे. 
 
तुर्कमेनिस्तानच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने अलीकडेच पाकिस्तानला भेट देऊन प्रकल्पाबाबत हिरवा कंदील दाखवला आहे. काही परवानग्यांची आैपचारिकता बाकी आहे. मात्र, प्रकल्पाच्या
उद्घाटनाचा कार्यक्रम शुक्रवारी पाकिस्तानात होणार आहे, अशी माहिती आंतरराज्यीय गॅस विभागाचे व्यवस्थापकीय संचालक मोबिन सौलत यांनी दिली.  
 
अलीकडेच गॅस वाहिनीच्या मार्गावरील पाहणीदेखील करण्यात आली. त्यासाठी अभियंत्यांच्या पथकाने संबंधित प्रदेशाचा दौराही केला. प्रकल्पासाठी तापी नावाची कंपनी स्थापन करण्यात आली आहे. तुर्कमेनिस्तानमध्ये गॅस फील्ड इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे, असे सौलत यांनी सांगितले.
 
गॅस पाइपलाइनच्या माध्यमातून दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित होईल, असा विश्वास प्रकल्पातील सहभागी राष्ट्रांना वाटतो. त्यानुसार तुर्कमेनिस्तान सुमारे २५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल. त्यात दररोज ३.२ अब्ज क्युबिक फूट गॅस उत्पादन केले जाईल. त्याचा लाभ भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तानला होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...