आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही पत्रकार मृत्यूचा तपास करावा, युनेस्कोची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्रे- व्यापमं घोटाळ्याचे कव्हरेज करताना गूढ स्थितीत टीव्ही पत्रकार अक्षय सिंह यांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेचा तपास करण्यात यावा, अशी मागणी संयुक्त राष्ट्राची संस्था युनेस्कोने शनिवारी केली आहे. त्यामुळे केंद्रावर आता आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आहे.
मध्य प्रदेशातील घोटाळ्याने देश हादरला. त्याचबरोबर आता संयुक्त राष्ट्राने दखल घेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ठामपणे बाजू घेत केंद्र सरकारला हा सल्ला दिला आहे. शिक्षण, संशोधन, सांस्कृतिक संघटनेच्या (युनेस्को) संचालक इरिना बोकोव्हा यांनी सिंह यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे. त्याचबरोबर सिंह यांच्या कुटुंबीयांविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे. कायद्याचे राज्य आहे. मग घटनेचा योग्य पद्धतीने तपास व्हायला हवा. जेणेकरून सिंह यांच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचा उलगडा होईल.

३८ वर्षीय सिंह शोध पत्रकार म्हणून एका खासगी हिंदी वृत्त वाहिनीत होते. व्यापमं घोटाळ्याचे वृत्तांकन करताना त्यांचा या महिन्याच्या सुरुवातीला गूढ मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्यापमंशी संबंधित सुमारे दोन डझन व्यक्तींचा गूढरीत्या मृत्यू झाला आहे. सरकारी विभागातील विविध अधिकारी पदांसाठी विद्यार्थ्यांकडून लाच घेण्याचे हे प्रकरण आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबाआयमार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील नोकरभरतीचाही यात समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...