आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: 9 वर्षाच्या मुलीने टीव्‍ही सीरियल पाहून केली आईची प्रसूती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - आजची मुले सर्वात पुढेच दिसतात.असचं कार्य लंडनमधील 9 वर्षाची ट्रिनिटी कुलेने केले आहे.तिने आपल्या आईच्या प्रसूतीत मोठी मदत केली.ही आश्‍चर्याची गोष्‍ट आहे, की या छोट्याशा मुलीला कुठून प्रशिक्षण मिळाले? याचे उत्तर आहे, ती चिमुकली सर्वांना चुकवून एक हॉस्पिटल टीव्ही मालिका वन बॉर्न एव्हरी मिनिट पाहायची. घटना मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्याची आहे. ट्रिनिटीच्या आईला वेदना कळा सुरु झाल्या.
जवळच्या लोकांनी रुग्णवाहिकेसाठी फोन केला आणि ती येण्‍याची वाट पाहत राहिले. तोपर्यंत ट्रिनिटी बाथरुममध्‍ये पळत गेली आणि तेथून खूप सारे टॉवेल आणले. अगदी व्यावसायिक नर्सप्रमाणे तिने आपल्या आईला मदत करण्‍यास सुरुवात केली आणि पाच मिनिटांमध्‍ये यशस्वी प्रसूती केली.फ‍िंग्रीगों प्रांतातील एसेक्स गावात ही मुलगी आपल्या कुटूंबासह राहते. वन बॉर्न एव्हरी मिनिट ही टीव्ही मालिका न पाहण्‍याचे सक्त ताकीद तिला घरच्यांनी दिले होते. तरीही ती लपून-छपून ती मालिका पाहायचे. त्याचा फायदा तिला आपल्या आईच्या प्रसूतीच्या वेळी झाला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा,ट्रिनिटी तिची आ‍ई आणि नव अर्भकाचे फोटोज...