आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मघातली हल्ल्याने हादरले अफगाण, सॅलरी घेण्यासाठी आलेले 37 जण ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: आत्मघातकी हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाला नेताना एक नागरिक)
जलालाबाद- अफगाणिस्तानमधील जलालाबाद शहर आज (शनिवार) सकाळी दोन आत्मघातकी हल्ल्यांनी हादरले. दहशतवाद्यांनी एक खाजगी बॅंक आणि मशिदीला टार्गेट केले. या हल्ल्यात बॅंकेत सॅलरी घेण्‍यासाठी आलेल्या 37 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

जलालाबाद नगरपालिकेजवळ असलेल्या मशिदीत दुसरा स्फोट झाला. काबुल बँकेत स्फोट झाला तेव्हा लोक सॅलरी काढण्यासाठी रांगेत उभे होते. हल्लेखोराने अचानक बॅंकेत प्रवेश करून स्वत:ला बुडवून घेतले.
अफगाणिस्तानातील पूर्वेला असलेल्या नैनगर्हर प्रांतात जलालाबाद शहर आहे. येथून पाकिस्तानाची सीमा जवळच आहे. अफगाणिस्तानात जोपर्यंत अमेरिकन जवान तैनात आहेत तोपर्यंत अशाप्रकारचे हल्ले सुरुच राहातील, अशी धमकी तालिबान्यांनी दिली आहे.
दरम्यान, अफगाणिस्तान 9,800 अमेरिकन जवान तैनात आहेत. अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सैन्य मायदेशी बोलवण्याची योजना पुढे ढगलली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, आत्मघाती हल्ल्याची भीषणता दर्शवणारे PHOTOS...