आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्तीशाली आत्मघातकी बॉम्बस्फोटांनी इराक हादरले; 27 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - यादवीग्रस्त इराकच्या कर्राडा आणि बगदादमध्ये दोन जबरदस्त बॉम्बस्फोट घडून आले आहेत. अवघ्या 24 तासांतच झालेल्या दोन्ही बॉम्बस्फोटांनी किमान 27 जणांचा मृत्यू झाला. तसेच 50 हून अधिक नागरिक सुद्धा जखमी झाले आहेत. हे दोन्ही आत्मघातकी कार बॉम्बस्फोट होते असा दावा स्थानिकांनी केला आहे. जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना इसिसने बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली आहे.
 
- अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराकची राजधानी बगदाद येथील अल-शहादा ब्रिज आणि कर्राडा परिसरात दोन आत्मघातकी कार बॉम्बस्फोट झाला. 
- पहिला बॉम्बस्फोट कर्राडा उपनगरात मंगळवारी सकाळी झाला. यात 15 जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर 30 जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची परिस्थिती चिंताजनक आहे. 
- दुसरा बॉम्बस्फोट राजधानीतील अल-शहादा ब्रिज परिसरात झाला आहे. यात 7 जणांच्या मृत्यूची आणि 20 हून अधिक लोक जखमी असल्याची नोंद आहे. 
- विशेष म्हणजे, मुस्लिम पवित्र महिना रमजान सुरू असतानाच हे दोन्ही बॉम्बस्फोट घडून आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...