बेल्जियम - पॅरिस हल्ल्यानंतर ब्रसेल्समध्ये आणीबाणी असून लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या हल्ल्याचा मास्टरमाइंड बेल्जियमचाच होता. दरम्यान, या भागात पोलिसांचे धाडसत्र सुरूच असून आतापर्यंत २१ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सरकारने पोलिस कारवाईचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकण्यास बंदी घातली आहे. दरम्यान, देशातील दहशतवादाचे वातावरण आणि तणाव कमी करण्यासाठी लोकांनी मांजरीचे मेमो पोस्ट करून दहशतवादाची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. पोलिसांच्या समर्थनार्थ या अभियानात सोमवारी पहाटेपर्यंत सुमारे १ लाख ७० हजार लोकांनी हॅशटॅग केले होते.
सोशल मीडियावर व्हायरल झाले # ब्रसेल्स लॉकडाऊन हॅशटॅग, मेमोची काही निवडक छायाचित्रे आणि ट्विट
ब्रेकिंग न्यूज : अतिरेक्यांना शोधण्यासाठी आमचे पोलिस ताशी २०० किमी वेगाने उडणाऱ्या "हॉवरकॅट'चा उपयोग करत आहेत. खरंच, ही अप्रतिम बाब आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, काही निवडक छायाचित्रे आणि ट्विट