आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बकरी ईदच्या नमाज वेळी आत्मघातकी हल्ल्याने हादरले यमन, 29 जण ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सना- यमनची राजधानी सना गुरुवारी सकाळी दोन आत्मघातकी हल्ल्यांनी हादरली. एका शिया मशिदीत सकाळी बकरी ईदची नमाज अदा केली जात असताना दोन्ही हल्ले झाले. यात 29 जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहे. या भागात बंडखोरांचे वर्चस्व आहे.

मिळालेली माहिती अशी की, पोलिस अकादमीजवळील बलीली मशिदीत बकरी ईदच्या (ईद अल-अधा) नमाजा वेळी दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी स्वत:ला उडवून घेतले. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. मागील तीन महिन्यांपूर्वी सनामधील एका मशिदीला निशाणा बनवण्यात आले होते. त्यानंतरचा हा सहावा आत्मघातकी हल्ला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, आत्मघातकी हल्ल्यानंतरचे फोटोज...