आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराक: मोसूलमध्ये आठवडाभराआधी जेथे बचाव मोहीम थांबवली होती तिथे दोन मुले जिवंत आढळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोसूल- येथे वेगवेगळ्या ठिकाणी ढिगाऱ्यात दबलेल्या दोन मुलांना वाचवण्यात आले. त्यांच्या रडण्या-ओरडण्याचा आवाज ऐकून सुरक्षा रक्षक त्यांच्याजवळ गेले. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या दाव्यानुसार, ही मुले इसिस दहशतवाद्यांची असून ते मूळची रशियाची आहेत. त्यापैकी एक मुलगा जिवंत राहण्यासाठी कच्चे मांस खात होता. 

मुलगी अमिनाचे म्हणणे आहे की, ‘माझे आई-वडील आत्मघाती बॉम्बहल्ल्यात ठार झाले होते.’ बोलण्यावरून ही मुलगी रशियाची वाटत आहे. ढिगाऱ्याखाली कोणीही जिवंत राहिले नसावे, असे गृहीत धरून या जागी सात दिवसांपूर्वी बचाव मोहीम थांबवण्यात आली होती. दोघांनाही पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आले आहे.