आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two day Visit To The UAE Minister Narendra Modi Arrived In Abu Dhabi

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच मशिदीत; मोदी-मोदींच्‍या घोषणांनी स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मशिदीमध्‍ये जाताना पंतप्रधान मोदी. - Divya Marathi
मशिदीमध्‍ये जाताना पंतप्रधान मोदी.
अबूधाबी - वाळवंटातील स्वर्ग म्हणून जगभर ओळख असलेल्या संयुक्त अरब-अमिरातीत (यूएई) पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दाखल झाले. दोन दिवसांच्या या दौऱ्यात मोदी अबूधाबी आणि दुबईचा दौरा करतील. भारतात ज्या गतीने आर्थिक सुधारणा सुरू आहेत त्या पाहता यूएईच्या दृष्टीने भारत गुंतवणुकीसाठी एक आकर्षक सुरक्षित स्थान ठरू शकतो, असे मोदी यांनी येथे सांगितले. दरम्‍यान, ते प्रथमच मशिदीत गेले. त्‍या ठिकाणी भारतीय वंशाच्‍या नागरिकरांनी मोदी-मोदींच्‍या घोषणांनी त्‍यांचे स्वागत केले.

अबुधाबी विमानतळावर अमिरातीचे युवराज तसेच लष्कराचे उपप्रमुख शेख मुहम्मद बिन जय्यद अल नाहयान यांनी मोदींचे जोरदार स्वागत केले. युवराजांच्या निमंत्रणावरूनच मोदींचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. मोदींनी यूएईचे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान शेख मुहम्मद बिन रशीद अल मकतूम यांची भेट घेतली.

यूएईतर मिनी इंडिया
मोदी यांनी यूएई म्हणजे मिनी इंडिया असल्याचे नमूद करून या देशाबद्दल आपल्याला मनस्वी प्रेम असल्याचे सांगितले. या देशाकडे कौशल्ये दूरदृष्टी असल्याचेही त्यांनी नमूद केले. केवळ दहशतवादविराेधी लढ्यातच नव्हे तर व्यापार गुंतवणुकीच्या क्षेत्रातही भारत या देशाला प्रमुख भागीदार बनवू इच्छितो, असे मोदी म्हणाले. तत्पूर्वी "खलिज टाइम्स'ला मोदी यांनी एक मुलाखत दिली. ही मुलाखत नंतर टि्वटर अकाउंटवरही प्रसिद्ध करण्यात आली आहे. मोदी म्हणाले, येथील २६ लाख भारतीय मायदेशीच्या भाषाच बोलतात. त्यांनी यूएईचे भारताशी नाते घट्ट केले आहे. यूएईच्या विकासातच नव्हे तर भारताच्या आर्थिक प्रगतीतही या भारतीय समुदायाचे मोठे योगदान आहे.
प्रथमच मशिदीत मोदी, घोषणांनी स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर संयुक्त अरब-अमिरातीत (यूएई) पोहोचले. भारतीय पंतप्रधानांचा हा ३४ वर्षांनंतरचा दौरा आहे. यापूर्वी इंदिरा गांधी येथे आल्या होत्या. मात्र, मोदींनी अबुधाबीच्या शेख झायद मशिदीत जाऊन सर्वांना चकित केले. पीएम झाल्यानंतर ते प्रथमच मशिदीत गेले आहेत. येथे उपस्थित हजारो लोकांनी 'मोदी-मोदी' अशा घोषणा दिल्या. मोदींनी मशिदीत सेल्फीही टिपली. सोमवारी ते सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाला भेट देतील. यानंतर ते दुबई क्रिकेट मैदानावर भारतीयांशी भेटतील.

३४ वर्षांनंतर पंतप्रधान यूएईत
भारतीयपंतप्रधानांचा ३४ वर्षांनंतरचा हा यूएई दौरा आहे. यापूर्वी १९८१ मध्ये इंदिरा गांधी दौऱ्यावर आल्या होत्या. सोमवारी मोदी दुबईला रवाना होतील. त्यांच्यासमवेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव एस. जयशंकर आदी असतील.

पेंटिंग प्रदर्शनास नकार
दुबईतराहणारे प्रसिद्ध भारतीय चित्रकार अकबर सईद यांनी मोदींच्या जीवनावर अाधारित काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याची परवानगी भारतीय वकिलातीने नाकारली. राजदूत टी. पी. सीताराम म्हणाले, सध्या असे प्रदर्शन भरवले जाण्याची शक्यता दिसत नाही. चित्रकार अकबर कर्नाटकातील रहिवासी असून ३८ वर्षांपासून ते या क्षेत्रात आहेत. मोदींसाठी त्यांनी खास चित्रे काढली असून जॉर्ज बुश बराक ओबामांसाठीही त्यांनी अशा खास पेंटिंग्ज तयार केल्या होत्या.
काय आहे उद्देश?
दोन दिवसीय या दौऱ्यामध्ये पंतप्रधान केवळ व्यावसायिक मीटिंगच करणार नाहीत तर तेथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांची भेटही घेणार आहेत. दोन्‍ही देशातील व्‍यावसायिक संबंध दृढ करणे हा या भेटीचा प्रमुख उद्देश आहे. या शिवाय दशतवादी संघटना आयएसआयएसवर चर्चा होऊ शकते.
आज रिसेप्शन
दुबई क्रिकेट स्टेडियमवर 17 ऑगस्‍टला रिसेप्शनचे आयोजन करण्‍यात आले आहे. यासाठी 50 हजार भारतीयांनी www.namoindubai.ae या वेबसाईटवर नोंदणी केली आहे. कार्यक्रमादरम्‍यान या ठिकाणचे तापमान 40 अंशाच्‍या आसपास राहू शकते. त्‍यामुळे गरमीपासून सुटका मिळावी, यासाठी विशेष व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. शिवाय स्टेडियमच्‍या बाहेर मोठी स्क्रीन लावली आहे. त्‍यावरही मोदी यांचे विचार ऐकता येणार आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...