आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन भारतीयांनी दिला अल कायदाला निधी, अमेरिकेत झाला आरोप निश्चित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अल कायदाचा प्रमुख अनवर अल-अवलाकी. फाइल फोटो. - Divya Marathi
अल कायदाचा प्रमुख अनवर अल-अवलाकी. फाइल फोटो.
वॉशिंगटन - अल कायदा या दहशतवादी संघटनेला मदत केल्‍याच्‍या आरोपाखाली अमेरिकेतील एका न्‍यायालयाने चौघांना दोषी ठरवले. यामध्‍ये दोन भारतीयांचाही समावेश आहे. अल कायदाचा प्रमुख अनवर अल-अवलाकी याला आर्थिक मदत करून इतर संसाधने उपलब्‍ध करून दिल्‍याचा त्‍यांच्‍यावर आरोप आहे. शिवाय या दोघांनी भारतात हल्‍ला करण्‍याबाबत चर्चाही केली होती. अवलाकी हा 2011 मध्‍ये अमेरिकेच्‍या ड्रोन हल्‍ल्‍यात ठार झाला होता.
या बाबत एका इंग्रजी वृत्‍तपत्राने दिलेल्‍या वृत्‍तानुसार, दोषी आढळलेले हे दोन भारतीय भाऊ असून, ते हैदराबाद येथील रहिवाशी आहेत. याह्या फारूख मोहम्मद (37) आणि इब्राहिम जुबेर मोहम्मद (36) अशी त्‍यांची नावे आहेत. त्‍यांच्‍या शिवाय आसिफ अहमद सलीम (35) आणि त्‍याचा भाऊ सुल्तान रूम सलीम (40) यांच्‍याविरुद्धही शुक्रवारी यूएस फेडरल कोर्टामध्‍ये आरोप निश्चित झाले आहेत.
काय आहे आरोप?
> 31 जानेवारी 2005 ला याह्या फारुख याने इब्राहिम जुबेरला एक ईमेल पाठवला. यात म्‍हटले, ''तिथे भारतात राहणारे मुस्लिम आपले भाऊ आहेत तर इतर शत्रू आहेत. आपण त्‍यांना चांगल्‍या पद्धतीने इस्‍लामबद्दल माहिती देऊ. जर त्‍यांनी विरोध केला आणि आपल्‍यात क्षमता असली तर त्‍यांना मुस्‍लीम कायद्याप्रमाणे तिथे राहू देऊ; अन्‍यथा त्‍यांना तलवारीने उत्‍तर दिले जाईल. हा जिहादचा काळ आहे. ''
>सरकारी सूत्रांनुसार, गुन्हा दाखल होण्याच्या चार आठवड्यापूर्वीच फारूखने अमेरिकेतून भारतात पळ काढण्याची योजना आखली होती. पण, त्‍यात ते यशस्‍वी झाले नाही. भारतीय अधिकाऱ्यांना संशय होता आहे की, या दोघा भावांनी भारतात जिहादियांना फंड दिला आहे.
>न्‍यायालयात निश्चित झालेल्‍या आरोपानुसार, जानेवारी 2005 ते जानेवारी 2012 च्‍या दरम्‍यान, चारही आरोपींनी अल-अवलाकीला पैसे, इक्वीमेंट आणि इतर मदत केली आहे. या बाबत सहाय्यक अॅटर्नी जनरल जॉन कार्लिन यांनी म्‍हटले, ''चार्जशीटमध्‍ये जे आरोप लावले गेले आहेत त्‍यानुसार, फारूख मोहम्मद, इब्राहिम मोहम्मद, आसिफ सलीम आणि सुल्तान सलीम यांनी अनवर अल-अवलाकी याला मदत केली किंवा मदत करण्‍याचा प्रयत्‍न केला. ''

>अमेरिकेतील न्‍याय विभागानुसार, फारूख 2002 ते 2004 दरम्‍यान, एका अमेरिकन विद्यापीठात अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. मार्च 2008 च्‍या जवळपास त्‍याने एका अमेरिकन युवतीसोबत लग्‍न केले. त्‍याचा भाऊ इब्राहिम याने 2001 ते 2005 मध्‍ये इंजीनिअरिंगची पदवी घेतली. 2006 मध्‍ये इब्राहिम टोलेडो गेला. त्‍यानेसुद्धा तिथे एका यूएस नागरिक मुलीसोबत लग्‍न केले. परिणामी, वर्ष 2007 मध्‍ये तो कायदेशीररीत्‍या अमेरिकेचा नागरिक बनला.