आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्तानबूल हल्ल्यात बॉलीवूड प्रोड्यूसर अबीस रिझवीसह गुजरातची तरुणी खुशी शाहचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इस्तानबूलच्या रियान नाइट क्लबमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांमध्ये दोन भारतीयांचाही समावेश होता. 'रोर' चित्रपटाचे निर्माते अबीस रिझवी यांचा नाईटक्लबमध्ये झालेल्या फायरिंगमध्ये मृत्यू झाला. अबीस हे माजी राज्यसभा खासदार अख्तर रिझवी यांचे पुत्र होते. सुषमा स्वराज यांनी रविवारी ट्वीटद्वारे याबाबत माहिती दिली. गुजरातच्या खुशी शाह हिचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी हल्ल्यात ठार झालेल्या दोन्ही भारतीयांच्या कुटुंबीयांशी फोनवर चर्चाही केली. 

सुषमा म्हणाल्या, इस्तानबूलहून वाईट बातमी 
- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीट केले की, मला तुर्कस्तानातून एक वाईट बातमी मिळाली आहे. 
- इस्तानबूलमधील हल्ल्यात दोन भारतीयांचाही मृत्यू झाला आहे. 
- दुसऱ्या ट्वीटमध्ये सुषमा यांनी लिहिले की, माजी राज्यसभा खासदारांचा मुलगा अबीस रिझवी आणि गुजरातची खुशी शाह या हल्ल्यात मारले गेले आहेत. 

कुटुंबीयांची मदत.. 
- अबीस रिझवी आणि खुशी शाह यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर त्यांचे कुटुंबीय इस्तानबूलला रवाना झाले आहेत. 
- अबीस यांचे पिता अख्तर रिझवी आणि आई तुर्कस्तानकडे रविवारी रात्री रवाना झाले. सुषमा यांनी अधिकाऱ्यांना सांगून त्वरित त्यांचा व्हिसा तयार करून घेतला. 
- तुर्कस्तानातील भारताचे अॅम्बेसेडर राहुल कुलश्रेष्ठ यांच्याशीही सुषमा यांनी चर्चा केली. भारतीय नागरिकांना इस्तानबूल एअरपोर्टवर रिसिव्ह करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही स्वराज यांनी दिले. 

सेलिब्रिटी सर्कलमध्ये प्रसिद्ध.. 
- इस्तानबूल हल्ल्यात ठार झालेले अबीस हसन माजी राज्यसभा खासदार अख्तर हसन रिझवी यांचे पुत्र आणि रिझवी बिल्डर्सचे सीईओदेखिल होती. 
- अबीस बॉलीवूड डायरेक्टर/प्रोड्यूसरही होते. सेलिब्रिटी सर्कलमध्येही अबिस फेमस होते. 
- अबीस यांनी 'रोर: टायगर ऑफ सुंदरबन' चित्रपटाची निर्मिती केली होती. सलमानने या चित्रपटाचे प्रमोशन केले होते. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार अबीस मित्रांबरोबर न्यू ईयर सलिब्रेशनसाठी मित्रांबरोबर तुर्कस्तानात गेले होते. 

रायफलद्वारे फायरिंग..     
- तुर्कस्तानचे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांच्या मते, हलल्यात 39 लोक ठार झाले आहेत. त्यापैकी 21 जणांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये 16 विदेशी आणि 5 तुर्कस्तानातील नागरिक होते. 
- स्थानिक वेळेनुसार रात्री सुमारे 1.45 वाजता सँटा क्लॉजच्या ड्रेसमध्ये आलेल्या एका हल्लेखोराने रायफलद्वारे लोकांवर फायरिंग सुरू केले. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार हल्लेखोरांनी क्लबमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पोलिसांवर फायरिंग केली. त्यानंतर ते क्लबमध्येही अंधाधुंद फायरिंग करू लागले. हल्ल्याच्यावेळी क्लबमध्ये 700 ते 800 लोक होते. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, हल्ल्यानंतरचे PHOTOS...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...