न्यूयॉर्क - अमेरिकेच्या लुसियाना प्रांताच्या लाफिएटमध्ये गुरुवारी रात्री एका चित्रपटगृहात झालेल्या फायरिंगमध्ये दोन जण ठार झाले आहेत. तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये फायरिंग करणाऱ्या व्यक्तीचाही समावेश आहे. ही फायरिंग कशामुळे करण्यात आली याबाबत मात्र काहीही माहिती मिळालेली नाही.
स्थानिक वेळेनुसार ही घटना सायंकाळी साडेसात वाजता घडली. जॉन्सन स्ट्रीट स्थित ग्रँड थिएटरमध्ये 'ट्रेन रेक' हा चित्रपट सुरू होता. प्रत्यक्षदर्शिंनी 6 राउंड फायरिंगचे आवाज ऐकले. प्रत्यक्षदर्शी केटीने सांगितले की, एका चाळीशीतील व्यक्तीने अचानकपणे फायरिंग सुरू केले. सिटी मार्शल ब्रायन पोपने दिलेल्या माहितीनुसार शूटरने बंदूक त्याच्याकडे फिरवली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडली. त्यामुळे त्याचाही मृत्यू झाला. जखमींना लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. लुसियाना प्रांताचे गव्हर्नल बॉबी जिंदालही लगेचच घटनास्थळी रवाना झाले होते. मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटो...