आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायजेरियाच्या मशिदीत दोन आत्मघातकी हल्ले, स्फोटांत 42 जणांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मशिदीत ब्लास्टनंतरची स्थिती. - Divya Marathi
मशिदीत ब्लास्टनंतरची स्थिती.
जोहान्सबर्ग - नायजेरियाच्या इस्टर्न सिटी मॅदुगुरीजवळ एका मशिदीत झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बस्फोटांत 42 जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी मशिदीमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या सर्वांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार शहराजवळ एका मशिदीत दोन हल्लेखोरांनी आत्मघातकी स्फोट घडवले. मशिदीबाहेर सुमारे 40 हून अधिक मृतदेह आढळून आले आहेत. तसेच स्फोटाने मशीद कोसळल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी मात्र मृतांचा आकडा केवळ 13 असल्याचे सांगितले आहे. या हल्ल्यात नायजेरियाच्या बोको हरम या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता आहे.

कसा झाला हल्ला...
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी एक दहशतवागी मशिदीमध्ये घुसला आणि त्याने गर्दीमध्ये जात स्फोट घडवला. त्यानंतर स्फोटातील जखमींची मदत करायला आलेल्या लोकांमध्ये जाऊन दुसऱ्या हल्लेखोराने ब्लास्ट घडवला.