वॉशिंग्टन/ह्युस्टन - टेक्सास येथे सुरू असलेल्या कार्टून काँटेस्टदरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन संशयितांचा मृत्यू झाला. गार्लेंड येथील कलवेल सेंटरच्या बाहेर चकमकीनंतर त्यांचे मृतदेह पडून होते. रविवारी रात्री ही घटना घडली. मृतांची आेळख अद्याप पटली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या दोघांकडे स्फोटके असल्याचा पोलिसांना संशय होता. स्पर्धा सुरू असताना त्या परिसरात पोलिसांनी त्यांना टीपले. यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. स्फोटके असल्याच्या संशयावरून पोलिस येथील वाहनांची झडती घेत असताना हा गोळीबार करण्यात आला. या दोन व्यक्तींच्या हातात बंदूक असल्याने कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. तेे गोळीबार करण्याची शक्यता होती. स्पर्धेसाठी झालेली गर्दी पाहता सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी या संशयितांवर फैरी झाडल्या. डलासमध्ये ही कार्टून बनवण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेवरून वाद होता. या वेळी पोलिसांनी चालत्या कारवर गोळीबार
केला.