आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमेऱ्यासमोर माकडचाळे करणाऱ्या दहशतवाद्याच्या मृत्यूचा VIDEO झाला व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीरियात प्रॉपोगांडा व्हिडिओ तयार करताना मोर्टार हल्ल्यात दोन दहशतवाद्यांच्या अगदी ठिकऱ्या उडाल्या. या घटनेचा व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झाला आहे. 27 नोव्हेंबर रोजी अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ 75 हजार वेळा बघण्यात आला आहे.
ही घटना हामा शहरातील उत्तर भागात घडली. या व्हिडिओतील दहशतवादी तल सुकेइक (Tal Sukayk) परिसरावर ताबा मिळाल्याचा आनंद साजरा करीत होते. यातील कॅमेरामनची ओळख अहमद अबू हमजा अशी करण्यात आली आहे. या कॅमेऱ्यासमोर बोलणाऱ्या दहशतवाद्याची ओळख अजनद अल-शाम गटाच्या सदस्याच्या रुपात करण्यात आली आहे.
काय आहे व्हिडिओत
- 31 सेकंदांच्या या व्हिडिओत दहशतवादी म्हणतो, की शुक्रिया अल्लाह. ही फार महत्त्वपूर्ण पोझिशन आहे. आम्ही विचार केला होता, त्यापेक्षा फार कमी संघर्ष करावा लागला.
- त्यानंतर लगेच मोर्टार गोळा तेथे येऊन पडतो. त्यानंतर धुळीचे ढग तयार होतात.
- ढग दूर गेल्यावर दोघांच्या ओरडण्याचा आवाज येतो. कॅमेरा बंद होतो.
या घटनेचा व्हिडिओ बघा, पुढील स्लाईडवर....