आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतुलनीय... दाेन हजार मीटर उंचीवर दाेन फूट बर्फात पायी चालत टिपले हे छायाचित्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अडचणीच्या परिस्थितीत एखादे काम करायचे असेल अाणि त्यासाठी वेळदेखील अतिशय कमी असेल तर अाव्हाने अधिकच वाढतात. स्वित्झर्लंडमधील पत्रकार जीन विमरलिन यांनी अापल्या ग्लेशियर एक्स्प्रेसचे हे छायाचित्र टिपण्यासाठी बराच संघर्ष केला. दाेन फूट बर्फात पायी चालत स्विसमधील अाल्प्स पर्वतरांगांच्या जर्मेट टाेकावर पाेहाेचले. या छायाचित्राबद्दल ते म्हणाले, बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे रेल्वे उशिरा निघालेली हाेती, त्यामुळे मला वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. कॅमेऱ्यात केवळ चार सेल हाेते. ते निकामी हाेण्यापूर्वीच बर्फवृष्टी सुरू असताना डाेंगररांगांतून लाल रंगाची ग्लेशियर एक्स्प्रेस निघाली अाणि हा फाेटाे क्लिक करता अाला. जीनने त्यास ‘रेड अॅराे’ असे नाव दिले. 

- १९३० पासून ग्लेशियर एक्स्प्रेस रेल्वे चालत अाहे, पूर्वी तीन कंपन्यांकडे त्याची मालकी हाेती. अाता केवळ एकच कंपनी तिचे पूर्ण संचालन करत अाहे. 
- २,०३३ मीटर उंचीवर ही रेल्वे साडेसात तासांत सेंट माेरिट्जपासून जर्मेटपर्यंतचा प्रवास पूर्ण करते. यादरम्यान ती २९१ पूर्ण अाणि ९१ बाेगद्यांतून ती जाते. 
-zivot.cas.sk
बातम्या आणखी आहेत...