आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS च्या राजधानीची परिस्थिती, महिलांनी जीवधोक्यात टाकून बनवला व्हिडिओ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्का - सीरियात इस्लामिक स्टेटच्या(आयएसआयएस) नियंत्रणा खालील रक्का शहराचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तो दोन महिलांनी जीवधोक्यात टाकून बनवला आहे. व्हिडिओत आयएसआयएसचे दहशतवादी हातात शस्त्रे घेऊन गस्ती करताना दिसत असून नागरी युध्‍दात जमीनदोस्त झालेल्या इमारती दिसत आहेत. एक महिला मुलाखतीत म्हणते, की आयएस दहशतवादी भयानक पध्‍दतीने लोकांची हत्या करीत आहे. महिलाने काय सांगितले...
- व्हिडिओत एक महिला ओऊम मोहम्मदने सांगितले, की आयएसआयएसचे दहशतवादी हत्या करणा-या व्यक्तींना काळे कपडे घालून त्यांना रांगेत बसवतात.
- मग सर्वांना गोळ्यांनी उडवले जाते. गोळ्या झाडल्यानंतर त्यांचे शिरच्छेदही केले जाते.
- त्यांचे शिर रस्त्यावरील खुंटीला लटकवले जाते.
- ओऊमच्या मतानुसार, त्यांना नेहमी चेह-यावर मुखवटा ठेवावे लागते. सर्व महिलांना चेहरा दाखवायचा असतो. मात्र त्यांना याचे स्वातंत्र नसते.
व्हिडिओ चित्रण करणारी एक महिला सीएनएनमधून
- व्हिडिओ चित्रण करणा-या महिलांची ओळख स्पष्‍ट झालेली नाही. मात्र एक महिला सीएनएनचे स्वीडिश चॅनल एक्सप्रेशन टीव्हीशी संलग्न आहे.
- पूर्ण शहर रिकामे झाले आहे. आयएसचे दहशतवादी शिल्लक सीरिया नागरिकांकडून ओळखपत्र हिसकावून घेत आहेत. यामुळे ती तुर्कस्तानमध्‍ये पळून जाऊ नये.
- आयएसने कॅथोलिक चर्चला आपले पो‍लीस मुख्‍यालय बनवले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा आयएसआयएसच्या नियंत्रणाखालील रक्का शहराची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...