आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Women\'s Get Graduate From Army Ranger Course Of Us Military

पुरुषांसारखेच खडतर ट्रेनिंग घेऊन यूएस रेंजर स्कूलमधून प्रथमच ग्रॅज्युएट झाल्या 2 महिला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहकाऱ्यांसह शाए हेवर (डावीकडे) आणि ग्रिस्ट. - Divya Marathi
सहकाऱ्यांसह शाए हेवर (डावीकडे) आणि ग्रिस्ट.
जॉर्जिया - अमेरिकेच्या लष्कराच्या प्रसिद्ध रेंजर स्कूलमधून ट्रेनिंग पूर्ण करून प्रथमच दोन महिला सैनिक क्रिस्टेन ग्रीस्ट आणि शाए हेवर यांनी इतिहास रचला आहे. या दोघी आर्मी रेंजर स्कूलमधील सर्वप्रथम ग्रॅज्युएट झालेल्या महिला बनल्या आहेत. जॉर्जियाच्या फोर्ट बेनिंगमध्ये खडतर ट्रेनिंग घेतल्यानंतर परीक्षा पास केलेल्या 96 जणांपैकी या दोघींचा समावेश आहे.

26 वर्षांच्या लेफ्टनंट क्रिस्टेन ग्रिस्ट मिलिट्री पोलिसात अधिकारी होती. तर 25 वर्षांची कॅप्टन शाए हेवर टेक्सासमध्ये हेलिकॉप्टर पायलट होती. महिलांसाठी आर्मीने ट्रायल बेसवर कोर्स सुरू करण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. लष्करात त्यांच्यावर काय जबाबदारी असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ग्रॅज्युएट जवानांप्रमाणेच या दोन्ही महिला रेंजर रेजिमेंटमध्ये भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत.

अत्यंत कठीण प्रशिक्षण
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय पेंटॉगॉनने दिलेल्या माहितीनुसार रेंजर स्कूलमध्ये आर्मीचे प्रिमिअर कॉम्बॅट लीडरशीप कोर्समध्ये स्टुडंट्सना थकवा, भूक आणि तणावाचा सामना करत ट्रेनिंग पूर्ण करावी लागते. एप्रिलमध्ये 381 पुरुष आणि 19 महिलांनी हे ट्रेनिंग सुरू केले होते. त्यांना कमीत कमी अन्न आणि ठरावीक झोप घेऊन जंगल आणि डोंगरांवर सर्व अडथळ्यांना सामोरे जात ट्रेनिंग पूर्ण करावे लागते. 120 दिवसांपेक्षा जास्त दिवस चाललेल्या या कोर्समध्ये अखेर केवळ 94 पुरुष आणि 2 महिलांनी हे ट्रेनिंग पूर्ण केले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ट्रेनिंगचे PHOTOS