आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Yazidi Women Narrated Horrified Story Of Rape By ISIS

ISIS च्या कैदेतून सुटलेली महिला म्हणाली- रेपचा विरोध केला तर मुलांना बेदम मारायचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेरुत- ISIS या दहशतवादी संघटनेच्या कैदेत असलेल्या दोन यजिदी महिलांनी अगदी अंगावर काटा उभा करणारे अनुभव सांगितले आहेत. दहशतवाद्यांनी या दोन महिलांना घरुन पळवून नेले होते. त्यानंतर दोघींवर अनेक महिने बलात्कार करण्यात आले. त्यांना सेक्स स्लेव्ह करण्यात आले. सध्या दोन्ही महिला इराकमधील एका रेफ्युजी कॅम्पमध्ये राहत आहेत. त्यांनी ब्रिटिश न्युज वेबसाईट मेल ऑनलाईनला आपले अनुभव सांगितले आहेत.
मॉर्फिन देऊन बेशुद्ध करायचे
दोघींपैकी एका 25 वर्षीय महिलेने सांगितले, की दहशतवाद्यांनी मला अनेकदा विकले. माझ्यावर अनेकदा बलात्कार झाले. मॉर्फिन देऊन मला बेडला बांधले जायचे. त्यानंतर बलात्कार केला जायचा. या औषधामुळे काय होत आहे याची मला कल्पना नसायची. बलात्कार करताना मी आरडा ओरडा करु नये यासाठी असे केले जायचे. एकदा मी बलात्काराचा विरोध केला होता. तेव्हा एका दहशतवाद्याने मला एवढे मारले, की दोन महिने मी पायांवर उभी राहू शकत नव्हते.
दुसऱ्या एका 19 वर्षीय महिलेने सांगितले, की मी बलात्काराला विरोध केला तर माझ्या मुलाला बेदम मारायचे. त्याला बसणारा मार मला सहन होत नव्हता. एकदा मी आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. पण मुलाचा विचार मनात आल्याने तसे केले नाही.
दहशतवाद्यांनी आतापर्यंत 200 यजिदी महिलांचे अपहरण केले आहे. त्यातील बहुतांश महिलांना सेक्स स्लेव्ह करण्यात आले आहे. या महिलांना बाजारात विकले जाते. ग्राहक जेव्हा त्यांना खरेदी करायला येतो तेव्हा महिलांना कपडे काढायला सांगितले जाते. त्यानंतर बोली लावली जाते.
ISIS कडून केली जाते व्हर्जिनिटी टेस्ट
या दोन महिलांनी सांगितलेल्या अनुभवावरुन दिसून येते, की या दहशतवादी संघटनेकडून गैरइस्लामी लोकांवर कसे अत्याचार केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी या दहशतवाद्यांनी एका 14 वर्षीय यजिदी मुलीची व्हर्जिनिटी टेस्ट केली होती. त्यांना या मुलीला मोठ्या किमतीला विकायचे होते. इराक आणि सिरीयात हजारो यजिदी महिलांना विकले जात आहे, असे अॅमनेस्टी इंटरनॅशनलने आपल्या अहवालात म्हटले आहे. यातील काही तरुणींचे वय 14 वर्षांपेक्षा कमी असल्याचेही सांगितले जाते.
पुढील स्लाईडवर बघा, ISIS ने सेक्स स्लेव्ह केलेल्या महिला... अशी केली जाते विक्री...