आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ढाका फॅक्ट्री दुर्घटनेला दोन वर्ष पुर्ण; पाहा, हृदय हेलावून टाकणाऱ्या क्षणाच्या आठवणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेशनल डेस्क - बांग्लादेशच्या ढाका शहरात राना प्लाझा दुर्घटनेला आज दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. परंतु या दोन वर्षानंतरही पीडित कुटुंबियांच्या मनातून या दुर्घटनेच्या आठवणी मिटल्या नाहीत, तर देशातील औद्योगिकरणामध्ये काहीही महत्त्वाचे बदल झाले नाहीत. वर्षभरानंतर 24 एप्रिल ही तारीख पुन्हा परतली आहे, परंतु या दुर्घटनेत सर्वकाही गमावून बसणाऱ्या कुटुंबियांच्या आयुष्यात आनंद परतला नाही. या दुर्घटनेत जवळपास 1,130 लोक दगावले होते, तर 2,000 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. या दुर्घटनेचे कारण शोधल्यानंतर या इमारतीच्या बांधकामातील कामचुकारपणा लक्षात आला. या आठ मजली इमारतीची निर्मिती सुरक्षा मानांकनानुसार नव्हती. यामुळेच एवढ्या लोकांना त्याची शिक्षा भोगावी लागली.

इमारतीच्या वापराबद्दल मिळाली होती सुचना
इमारतीत पडलेल्या भेगापाहून अपघाताच्या एका दिवसापूर्वीच ही इमारत वापरू नये असा सुचना देण्यात आली होती. मात्र या सुचनेकडे दुर्लक्ष करत गारमेंट कारखाना प्रशासनाने कामगारांना कामावर बोलावले आणि हीच गोष्ट त्यांना महागात पडली. या इमारतीत पाच रेडीमेट गारमेंट कारखाने चालत होते, ज्यामधून अनेक युरोपियन आणि अमेरिकन कंपन्यांना कपड्यांचे सप्लाय केले जात होते. याशिवाय या इमारतीत बँक, दुकाने आणि अपार्टमेंटसुध्दा होते.
43 लोकांना ठरवले आरोपी
अपघाताच्या दुसऱ्या दिवशी ढाका शहर विकास प्राधिकरणाने या इमारतीचा मालक आणि पाच गारमेंट कारखान्यांच्या मालकांविरूध्द गुन्हा दाखल केला. दुर्घटनेच्या चार दिवसांनंतर म्हणजेच 28 एप्रिलला इमारतीचे मालक सोहेल राणाला पोलिसांनी अटक केली. बांग्लादेशच्या गृहमंत्रालयतील सूत्रांनुसार, या प्रकरणात सोहेल राणा समवेत 43 लोकांना आरोपी बनवण्यात आले आहे. यामध्ये इमारतीच्या मालकासमवेत कारखाना मालक, सरकारी अधिकारी आणि अनेक गारमेंट कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पुढील स्लाईडवर पाहा, या दुर्घटनेची हृदय हेलावून टाकणारी छायाचित्रे...
(टीप- हे फोटो तुमचे लक्ष्य विचलीत करू शकतात.)