आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅटेलाइट इमेजमध्‍ये खुलासा- उत्‍तर कोरिया पुन्‍हा आण्‍विक चाचणीच्‍या तयारीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - उत्‍तर कोरिया लवकरच पाचवी आण्विक चाचणी करण्‍याच्‍या तयारीत आहे. एका अमेरिकी थिंक टँकने आण्विक चाचणीसंदर्भात कमर्शियल सॅटेलाइट इमेज पाहिल्‍यानंतर ही बाब सांगितली आहे. ही सॅटेलाइट इमेज 5 मे रोजी घेण्‍यात आली. या इमेजमध्‍ये मोठ्या हालचाली होत असल्‍याचे दिसत आहे. रूलिंग पार्टीच्‍या बैठकीदरम्‍यान होऊ शकते चाचणी..
- अमेरिकेच्‍या जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीच्‍या 38 नॉर्थ वेबसाइटनुसार, '' या इमेजमध्‍ये उत्‍तर कोरियाच्‍या न्यूक्लियर टेस्ट साइट पुन्गे-रीवर ठळक हालचाली लक्षात येत आहेत.''
- उत्‍तर कोरियातील रुलिंग वर्कर्स पार्टीच्‍या बैठकीच्‍या दरम्‍यान पाचवी आण्विक चाचणी होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.
- 38 नॉर्थच्‍या विश्लेषणानुसार, 6 किलोमिटर भागात वाहनांचे आवाज मोठ्या प्रमाणात येत आहेत. हेच कमांड सेंटर असू शकते असा अंदाज आहे.
- अमेरिकेच्‍या एका वरिष्‍ठ अधिका-याने सांगितले, ''रिपब्लिक ऑफ कोरिया आणि जपानच्‍या सुरक्षेची आम्‍ही हमी दिली आहे.''
- ''कोणत्‍याही प्रकारचा हल्‍ल्‍यापासून आम्‍ही आमचे सहयोगी आणि स्‍वत:ला वाचवण्‍याची तयारी करत आहोत. ''
- 38 नॉर्थ वेबसाइटने गेल्‍या महिन्‍यातही सांगितले होते की, सॅटेलाइट इमेजमध्‍ये आण्‍विक चाचणीसंदर्भात हालचाली दिसत आहेत.
उत्तर कोरिया का बनवत आहे आण्विक शस्त्रे
-
उत्‍तर कोरियाने 1985 मध्ये NPT (परमाणू अप्रसार संधी) मान्‍य केली होती.
- त्‍याअंतर्गत उत्‍तर कोरियाला आण्‍विक शस्त्रे विकसित करता आली नाहीत. मात्र नंतर त्‍यांनी करार मान्‍य केला नाही.
- 2003 मध्ये, उत्तर कोरियान स्वतःला या करारापासून वेगळे असल्‍याचे वेगळे घोषित केले होते.
उत्तर कोरियाने केली आहेत अनेक आण्विक चाचण्‍या
- 9 ऑक्टोबर, 2006 - प्रथमच जमिनी खाली घेतली अणू चाचणी.
- 25 मे, 2009 - दुस-यांदा अणू चाचणी
- 13 जून, 2009 - युरेनियम समृध्‍दीकरणाचा कार्यक्रम आखला जाईल,असे उत्तर कोरियाने सांगितले. यामुळे आण्विक शस्त्र किंवा प्लुटोनियमवर आधारित रिएक्टरची निर्मिती केली जाईल असा अंदाज बांधला जात होता.
- 11 मे, 2010 - न्यूज फ्यूजन रिएक्टर बनवल्याचा दावा. उत्तर कोरिया आणखी शक्ती शाली बॉम्ब बनवले जाईल, अशी शंका उपस्थित करण्‍यात आली.
- 13 फेब्रूवारी, 2013 - तिस-यांदा अणू चाचणी घेतली.
- 10 डिसेंबर, 2015 - हुकुमशहा ऊनचा दावा, हायड्रोजन बॉम्ब चाचणीची क्षमता विकसित.
- 6 जानेवारी, 2016 - हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली.
- फेब्रूवारी, 2016 - लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी.
- 2 मार्च, 2016 लेजर गाइडेड अँटी टँक मिसाइल.
- 4 मार्च, 2016 - मल्टीपल लॉन्च रॉकेट सिस्टिम
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...