नासाच्या नवीन छायाचित्रात मंगळग्रहावर एलियन्सचे घर दिसल्याचा दावा केला आहे. हा दावा एलियनच्या अस्तित्वाचा शोध घेणा-या यूएफओ हंटर्सने केला आहे. नासाच्या स्पिरिट रोव्हरचे हे छायाचित्र 29 जून रोजी घेतले आहे. आठवडाभरापूर्वी युएफओ हंटर्सने मंगळावर एलियन दिसल्याचा दावा केला होता. घरात दरवाजा दिसल्याचाही दावा...
- यूट्यूब चॅनल Luxor2012UFO ने नासाच्या छायाचित्रात घराची प्रतिकृती दिसल्याचा दावा केला आहे.
- यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलेल्या क्लिपमध्ये मंगळग्रहावर दगडाचा एक तुकडा दिसत आहे.
- जवळून पाहिल्यावर या घरासारख्या दिसणा-या दगडात एक छोटासा दरवाजा दिसत आहे.
- कन्सपिरन्सी थेअरिस्ट याला एलियन्स किंवा त्यासारख्या प्रजातीचे घर असल्याचे सांगितले जाते.
- ufosightingsdaily वेबसाइट च्या स्कॉटसी वेअरिंगच्या ब्लॉग पोस्टनुसार, हे एकदम अस्सल आहे व हे कमालचा शोध आहे.
- वेअरिंगच्या दाव्यानुसार, यात दिसत असलेला दरवाजा 3 ते 6 इंच असेल.
एलियन दिसल्याचा दावा
- एका आठवड्यापूर्वी क्युरोसिटी रोवर्सने मंगळ ग्रहाचे घेतलेल्या एक छायाचित्रात एलियन दिसल्याचा दावा केला होता.
- यूट्यूब यूजर पॅरानॉर्ल क्रूसिबल यांचा दावा होता, की दगडाच्या कडेला दिसणारी छोटीसी वस्तू माणसाप्रमाणे दिसणा-या एलियनचे आहे.
- याला एक दशकापूर्वी चिलीच्या अटाकामा वाळवंटातून मिळालेल्या 6 इंचाच्या अनोख्या स्कॅल्टनची प्रजाती असल्याचे सांगितले जात होते.
पूर्वी असे दावा करण्यात आले
- या पूर्वीही क्यों रोवरने पाठवलेल्या छायाचित्रांबाबत वेगवेगळे प्रकारचे दावे करण्यात आले आहे.
- गेल्या दिवसांमध्ये एलियन हंटर्सने नासाने जारी मंगळच्या छायाचित्रांमध्ये महिलेपासून मिलिट्री बंकर, एलियन हंटर, खेकडा, शवपेटी आदी वस्तू दिसल्याचा दावा केला.
- नासा एलियन्सविषयीची माहिती समोर आणू इच्छित नाही, असे आरोप एलियन हंटर्सचा आहे.
- मात्र नासाने हे थेअरीज व दावे फेटाळून लावले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा कोणत्या छायाचित्रांबाबत दावे करण्यात आले...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)