आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खलिस्तान समर्थक शीख संघटनेवरील बंदी हटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - खलिस्तानला पाठिंबा असलेल्या "इंटरनॅशनल यूथ शीख फेडरेशन' या संघटनेवरील बंदी हटवण्याचा ब्रिटनचा विचार सुरू आहे. १५ वर्षांपासून बंदी असलेली ही संघटना दहशतवादी असल्याचे पुरेसे पुरावे नसल्याचे ब्रिटन संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्स या कनिष्ठ सभागृहातील चर्चेतून पुढे आले आहे. या संघटनेवरील बंदी हटवण्याची सूचना लवकरच संयुक्त राष्ट्रे आणि युरोपीय संघाला दिली जाईल.

ब्रिटिश संसदेतील चर्चेनुसार, इंटरनॅशनल यूथ शीख फेडरेशन (आयवायएसएफ) या संघटनेची स्थापना १९८० च्या दशकात पंजाबमध्ये करण्यात आली. त्या काळी हत्या, बॉम्बस्फोट आणि अपहरणाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत होती. या घटना मुख्यत्वे भारत सरकार आणि त्यांच्या अधिकाऱ्यांविरोधात होत्या. ब्रिटनच्या संसदेत दहशतवादाचा नायनाट करण्यासंदर्भात चर्चा सुरू होती.
बातम्या आणखी आहेत...