आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार पार्किंगवर कोसळले प्रायव्हेट जेट,लादेनच्या सावत्र आई-बहिणीचा मृत्यु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- 'अलकायदा' या दहशतवादी संघटनेचा मृत म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या सावत्र आई आणि बहिणीचा विमान अपघातात मुत्यु झाल्याचे वृत्त आहे. दोन्ही प्रायव्हेट जेटने प्रवास करत होत्या. दक्षिण लंडनमधील एअरपोर्टवर लॅंडिंगदरम्यान हे विमान कोसळले.
रनवेसोडून कार पार्किंगवर कोसळले विमान
लंडनमधील हॅम्पशायर-सरे बॉर्डरवरील ब्लॅकबुश एअरपोर्टवर हे विमान लॅंडिंग करत होते. मात्र, विमान रनवेसोडून जवळच असलेल्या 'ब्रिटिश कार ऑक्शन' पार्किंगवर कोसळले. पार्किंगमधील गाड्यांवर विमान कोसळताच त्याचा भीषण स्फोट झाला. त्यात चार प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्यात लादेनची सावत्र आई रज आ हशीम, सावत्र बहिण सना बिन लादेन आणि तिचा पती जुहेर हशीमचा समावेश आहे.

सौदी अरब मीडियानुसार, विमानात लादेनच्या सावत्र आई-बहिणीसह चार जणांचा मृत्यु झाला आहे. मृतांमध्ये विमानाचा पायलटचा समावेश आहे.

लादेनचे हे नातेवाइक सौदीतील प्रसिद्ध व्यापारी होते. सौदी अरेबियाचे राजदूत प्रिन्स मोहंमद बिन नवाफ अल सौद यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या सर्वांच्या मृतदेह ताब्यात घेणार असल्याचेही सौद यांनी सांगितले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, विमान अपघाताचे फोटोज...