आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये 23000 दहशतवादी घुसले; 3000 नागरिक बेपत्ता; मँचेस्टरमधील हल्ल्याची 2 वर्षांपासून तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - देशात सुमारे २३ हजार संशयित दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे, असा दावा ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेकडून करण्यात आला आहे. त्यापैकी ३ हजार यंत्रणेच्या रडारवरून गायब झाले आहेत.  

मँचेस्टरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तपासात लिबिया वंशाच्या सलमान अबेदी अगोदरपासूनच गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर होता. त्याच्याबद्दल आणखी कोणती माहिती मिळवता येईल, याचा शोध घेण्यात येत आहे. दुसरीकडे मँचेस्टर हल्ल्यासाठी दहशतवादी दोन वर्षांपासून तयारी करत होते, असे अन्य एका तपासातून उघडकीस आले आहे. हल्ल्यापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच जारी झालेआहे. बंदुकीचा ट्रिगर दाबताना हल्लेखोर त्यात दिसून येतो. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत १४ ठिकाणी छापे टाकले असून ११ जणांची धरपकड करण्यात आली आहे. हल्ल्यात २२ जणांचा मृत्यू तर ११९ जखमी झाले होते.   
 
मुलांनो, दहशतवाद्यांच्या नावे पत्र लिहा :   ब्रिटनमध्ये आता एक नवीन पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांच्या नावे पत्र लिहिण्याचे आवाहन करण्यात आले. आपल्याशी लोक चांगले वागत नाहीत. योग्य तो सन्मान देत नाहीत, अशी दहशतवाद्यांची धारणा असते. त्यामुळे ते लोकांना ठार करतात, असे पुस्तकात लिहिण्यात आले आहे. ७ ते ११ वर्षांच्या मुलांकडून शिक्षक अशा प्रकारचे पत्र लिहून घेणार आहेत.  
 
बाॅम्बच्या संशयाने कलाकार,रसिकांना  थिएटरमधून बाहेर काढले  : बाॅम्बच्या अफवेनंतर
लंडनच्या आेल्ड विक थिएटर तसेच परिसरातील पब, रेस्तराँ रिकामे करण्यात आले. शेकडो लोकांत स्टार वॉर्सचे कलाकार जॉन बोएगा यांचाही समावेश आहे. बोएगाला इम्पिरियल वॉर म्युझियममध्ये नेण्यात आले. दोन तासांनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. 
बातम्या आणखी आहेत...