आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fears For Ukraine’s Ceasefire As Clashes With Russia backed Rebels Intensify

पूर्व युक्रेनमध्ये दोन तासांतच युद्धविराम मोडला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किव - चार देशांच्या सहमतीनंतर अखेर रविवारच्या मध्यरात्रीपासून पूर्व युक्रेनमध्ये युद्धविराम लागू झाला. मात्र, त्यानंतर दोनच तासांनी रशियाचे फुटीरतावादी आणि युक्रेनने एकमेकांवर करार तोडल्याचा आरोप केला आहे. तत्पूर्वी, युक्रेनचे राष्ट्रपती पेट्रो पोरोशेंको यांनी लष्कराला गोळीबार बंद करण्याचे आदेश दिले.
मात्र, युद्धविरामाच्या आडून युक्रेन पूर्वोत्तर भागात लष्कर पाठवत असल्याचा आरोप फुटीरतावाद्यांनी केला आहे. दुसरीकडे युक्रेन लष्कर देबाल्तसेव्हमध्येही तैनात करण्यात येत आहे. फुटीरतावाद्यांच्या मते युक्रेन लष्कराने शहराला चहुबाजूंनी वेढा घातला आहे. पूर्व युरोपच्या देबाल्तोव्हमध्ये जारी असलेल्या संघर्षात रशियाचे जवानही सामील असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी म्हटले आहे.