लंडन - युक्रेनचा इंजिनिअर व्लादिमिर तातारेंको याने एक असे तंत्रज्ञान शोधले आहे, की आणीबाणीच्या प्रसंगी विमानातील प्रवाशांचा जीव वाचवला जाऊ शकतो. व्लादिमिरने आपल्या आयुष्याचा मोठा भाग या प्रकारच्या शोधासाठी लावली आहे.
तंत्रज्ञानात काय आहे? विमान सुरक्षितरित्या खाली उतरेल?
- या नव्या तंत्रज्ञानात विमानात वेगळे होणारे पॅसेंजर कॅबिन लावले जाईल.
- हे अपघात किंवा आणीबाणीच्या प्रसंगी विमानापासून वेगळे होईल.
- कॅबिन्सच्या दरवाजांना पॅराशूट लावले आहे, जे कॅबिनपासून विमान वेगळे झाल्यावर उघडतील.
- यामुळे कॅबिनची जमीन किंवा पाण्यावर सुरक्षित उतरले जाईल.
- याचे वैशिष्ट्य म्हणजे यात प्रवाशी सामानही ठेवू शकतील.
डिझाइन तयार करण्याला लागली तीन वर्षे
- व्लादिमिरने सांगितले, की विमान दुर्घटना झाली तरीही लोकांचा जीव वाचवणे शक्य होणार आहे.
- या नव्या तंत्रज्ञानात विमानाचे पंख, मुख्य भाग आणि मागील भाग बनवण्यासाठी कार्बन घटक आणि सिंथेटिक फायबरचा वापर केला जाईल.
- याचे कारण पॅराशूट जेव्हा हा भागासह खाली उतरेल तेव्हा त्याचे वजन कमी असावे.
- व्लादिमिरने या तंत्रज्ञानाबाबत सर्वसामान्य लोकांचे म्हणणे जाणून घेतले.
- यात सर्व लोकांनी त्याची प्रशंसा केली आहे.
- व्लादिमिरने गेल्या वर्षी 'एस्केप कॅप्सूल सिस्टिम'चा पेटंट घेतला आहे.
- हे सिस्टिम प्रवाशांनाही हवेतही सुरक्षित ठेवत असल्याचा दावा त्याने केला आहे.
असे कार्य करेल तंत्रज्ञान
- अपघाताच्या वेळी विमानाच्या मागील भागात लागलेल्या हॅचच्या मदतीने प्रवाशी कॅबिन काही सेकंदात कॉकपिटपासून वेगळे होईल.
- यानंतर गनपावडर इंजिनाची गती कमी होईल.
- व्लादिमिर म्हणतो, की जर विमानाच्या आत स्फोट किंवा हल्ला झाल्यास तेव्हा हे तंत्रज्ञान काम करु शकणार नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, व्हिडिओ...