आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये पालकत्व रजा ५० आठवड्यांची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनमधील नोकरी करणार्‍या दांपत्यासाठी खुशखबर आहे. बाळाच्या जन्मानंतर दोन्ही पालकांना यापुढे ५० आठवड्यांपर्यंत रजा मिळू शकेल. नवीन कायद्याची रविवारपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.

देशात अगाेदर मातृत्व रजा म्हणून दोन आठवड्यांची रजा आहे. त्याशिवाय आता ती ५० आठवड्यांपर्यंत घेता येणार आहे. त्यापैकी ३७ आठवड्यांची पगारी रजा मिळणार असल्याची तरतूद नवीन कायद्यात आहे. त्यामुळे पालकांना घरात आलेल्या नवीन पाहुण्याचे स्वागत आणि त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेता येणार आहे. लिबरल डेमोक्रॅट्सच्या आघाडी सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे; परंतु त्या अगोदर नवीन पद्धती लागू होण्यासाठी नियोक्ता आणि कर्मचारी यांच्यात सहमतीदेखील तितकीच महत्त्वाची ठरेल. त्यासाठी आठ आठवडे अगोदर पूर्व सूचना द्यावी लागेल.

दत्तक पालकांनाही फायदा
नवीन नियमानुसार ५ एप्रिल २०१५ रोजी किंवा त्यानंतर मूल दत्तक घेतलेल्या पालकांनाही नव्या कायद्यानुसार रजा मिळवण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. त्यानुसार मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला ही रजा घेता येऊ शकते.

महिलांवरील दबाव दूर
पालकत्व रजा कमी असल्यामुळे प्रसूती झालेल्या महिलांवर करिअर किंवा मूल यांच्यापैकी एकाची निवड करावी लागत होती. हा अन्याय आहे. ही पद्धती थांबवली पाहिजे, असे आग्रही मत ब्रिटनचे उपपंतप्रधान निक क्लेग यांनी स्पष्ट केले आहे.

पितृत्व रजेचा कालावधी कमी
आतापर्यंत ब्रिटनमध्ये पितृत्व रजेचा कालावधी केवळ एक किंवा दोन आठवडे होता. अपवादात्मक स्थितीत २६ आठवडे होते. त्यानंतर नोकरीवर हजर होणे बंधनकारक होते.

१०० शिक्षकांवर कारवाई होणार, कट्टरवाद्यांशी संपर्काचा ठपका
कट्टरवाद्यांशी संपर्क असल्याच्या प्रकरणी ब्रिटनमध्ये १०० शिक्षक आणि इतर शालेय कर्मचार्‍यांची चौकशी होणार आहे. नॅशनल कॉलेज फॉर टिचिंग अँड लीडरशिप (एनसीटीएल) संघटनेच्या वतीने अशा शिक्षक आणि कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.