आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UN Health Agency WHO Convenes Emergency Meeting For Spread Of Zika Virus

अमेरिकेत Zika Virus चे थैमान; 40 लाख अमेरिकन नागरिकांना धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिनिव्हा - आफ्रिका आणि आशियामध्ये आढळणारा झिका व्हायरस आता दक्षिण अमेरिकेपाठोपाठ उत्तर अमेरिकेत पसरला आहे. या व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत असल्याने सुमारे 40 लाख अमेरिकन नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायझेशनने (WHO) हायअलर्ट घोषित केला असून याबाबत एक फेब्रुवारीला आपातकालीन बैठक बोलावली आहे.

दुसरीकडे, ब्राझिलमध्ये सोशल एक्टिविस्ट्सच्या एका समुहाने सरकारला प्रेग्नेंट महिलालांना अबॉर्शन करण्‍याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

Zika Virus वरून Who ने अलर्टमध्ये काय म्हटले?...
- WHO नुसार, या व्हायरसचा मोठ्या प्रमाणात गर्भवती स्त्रीयांना संसर्ग झाला आहे. नवजात शिशुंवही त्याचा परिणाम दिसून येत आहे. नवजात बालकांच्या डोक्याचा आणि मेंदूचा पूर्णपणे विकास होत नसल्याचे दिसून आले आहे.
- WHOने Zika Virus वर तोडगा काढण्यासाठी एक फेब्रुवारीला आपातकालीन बैठक बोलावली आहे. 'इबोला'प्रमाणे 'ग्लोबल इमरजन्सी'ची घोषणा करण्यासंदर्भात बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.
- इबोला व्हायरसमुळे जवळपास 11 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

WHOच्या डायरेक्टर जनरलांनी दिला इशारा...
WHO चे डायरेक्टर जनरल मार्गेट चान यांनी सांगितले, की ''झिका व्हायरसचा धोका आता भयनाक स्तरावर पोहोचला आहे. व्हायरसची लागण झालेल्या गर्भवती महिला अशा मुलांना जन्म देतात, की त्यांच्या मेंदूचा पूर्णपणे विकास झालेला नसतो. गेल्या काही महिन्यांत मायक्रोसेफलीच्या सुमारे 1000 पेक्षा अधिक केसेस समोर आल्या आहेत. सरकार, सार्वजनिक आरोग्य विभाग, प्रशासन सगळेच या व्हायरसमुळे हतबल झाले आहेत.

ब्राझिलमधील दुषित हवामान, दाट लोकवस्तीची शहरे, दारीद्र्य आणि नियोजन नसलेल्या शहरांमुळे झिका व्हायरसचा प्रार्दुभाव झपाट्याने झाला आहे. ब्राझिलपाठोपाठ आता अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये झिका व्हायरस पसररला आहे. दाट लोकवस्तीमुळे मच्छरांसाठी पोषक वातावरण मिळते व त्यांच्या मार्फेत धोकादायक संसर्ग पसरत असल्याचे मार्गेट चान यांनी सांगितले आहे.

विविध आरोग्य संस्था आणि सरकारतर्फे देण्यात आलेल्या इशाऱ्यानंतर गर्भवती महिला मच्छरांपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्हायरसवर लस शोधण्यासाठी विविध देश संस्था प्रयत्न करत आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा,ब्राझिलमध्ये गर्भवती महिलांनी मागितली गर्भपाताची परवानगी...