आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS ची सेक्स स्लेव्हजसाठी प्राइज लिस्ट, 8000 रुपयांत मुलींचा लिलाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामिक स्टेटच्या तावडीतून पळालेल्या यहुदी बहिणी. त्या सध्या दुहोकच्या रेफ्युजी कॅम्पमध्ये राहत आहेत. - Divya Marathi
इस्लामिक स्टेटच्या तावडीतून पळालेल्या यहुदी बहिणी. त्या सध्या दुहोकच्या रेफ्युजी कॅम्पमध्ये राहत आहेत.
ISIS मुलींचा सेक्स स्लेव्हसारखा वापर करत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. पण प्रत्यक्षात या महिला आणि मुलींची काय किंमत ठरवली जाते याचा कधीही स्पष्ट उल्लेख झालेला नाही. संयुक्त राष्ट्राने प्रथमच IS च्या सेक्स प्राइज लिस्टचा खुलासा केला आहे. यात मुलींच्या वयानुसार त्यांचे दर ठरवण्यात आले आहेत. तसचे ISIS च्या सदस्यांसाठी त्यांचे दर काय असतील आणि इतर ग्राहकांसाठी काय असतील हेही स्पष्ट करण्यात आले आहे.

एप्रिल महिन्यात मिळाली होती लिस्ट
इस्लामिक स्टेटने गेल्या नोव्हेंबरमध्ये ही लिस्ट जारी केली होती. संयुक्त राष्ट्राला एप्रिलमध्ये त्याबाबतची हार्डकॉपी मिळाली आहे. त्यानंतर त्याची सत्यता पडताळण्यात आली. त्यानंतर आता संयुक्त राष्ट्राचे 'सेक्रेटरी जनरल फॉर सेक्श्युअल व्हायलेनंस इन कॉनफ्लिक्ट'च्या विशेष प्रतिनिधी जैनाब बांगुरा यांनी ही लिस्ट खरी असल्याचे म्हटले आहे. बांगुरा यांनी सांगितले की, येथे मुलींची सामानाप्रमाणे विक्री केली जाते. एका मुलीला 5 ते 6 वेगवेगळे लोक खरेदी करू शकतात. अनेकदा काही फायटर्स हजारो रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी या मुलींना पुन्हा त्यांच्याच कुटुंबाला विकतात.

वयानुसार ठरते किंमत
दहशतवादी वयानुसार या मुली, महिलांची किंमत ठरवतात. जेवढे वय अधिक असेल तेवढी किंमत कमी मिळते. या लिस्टनुसार ठरवण्यात आलेली किंमत खालीप्रमाणे आहे...
1 ते 9 वर्षांपर्यंतच्या मुलांची किंमत 165 डॉलर (साडे 10 हजार रुपये)
20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीची किंमत 124 डॉलर (सुमारे 8 हजार रुपये)
40 वर्षांपर्यंतच्या महिलांची किंमत 41 डॉलर (सुमारे 2617 रुपये)

ISIS चा मॅरेज ब्युरो
बांगुरा यांनी सांगितले की, इस्लामिक स्टेटचा स्वतंत्र मॅरेज ब्युरो आहे, त्यामार्फत लग्न आणि महिलांची विक्री केली जाते. त्याचठिकाणी यांचे दर ठरतात. किंमत ठरलेली असली तरी बाजारात लागणाऱ्या बोलीवरूनच या महिलांची किंमत ठरते असेही त्यांनी सांगितले. इस्लामिक स्टेटचे कमांडर खरेदीची पहिली संधी त्यांच्या सदस्यांना देतात. त्यानंतर श्रीमंत परदेशी लोकांना बोली लावण्याची संधी मिळते. अनेकदा हजारो डॉलरची बोली लागते.
बातम्या आणखी आहेत...