Home »International »Other Country» UN Report About Rohingyas In Myanmar

रोहिंग्यांना पळवून लावण्यासाठी म्यानमार लष्कराने केले हल्ले, युएनचा अहवाल

म्यानमारच्या राखिने प्रांतातून रोहिंग्या मुस्लिमांना देश सोडून पळून लावण्यासाठी भाग पाडण्यात आले आहे.

वृत्तसंस्था | Oct 12, 2017, 04:27 AM IST

  • रोहिंग्यांना पळवून लावण्यासाठी  म्यानमार लष्कराने केले हल्ले, युएनचा अहवाल
जीनिव्हा - म्यानमारच्या राखिने प्रांतातून रोहिंग्या मुस्लिमांना देश सोडून पळून लावण्यासाठी भाग पाडण्यात आले आहे. त्यासाठी म्यानमारच्या लष्कराने अल्पसंख्यांक समुदायाच्या विरोधात चाल खेळली आहे. लष्कराने जाणून-बुजून आपले दडपशाहीचे धोरण राबवले, असा दावा संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्कविषयक तपास दलाने आपल्या अहवालातून केला आहे.

म्यानमार सरकारने मानवी हक्क मूल्यांचे उल्लंघन केले आहे, असा आरोप मानवी हक्क विषयक विभागाचे प्रमुख जैद राद अल-हुसेन यांनी केला आहे. रोहिंग्यांच्या विरोधात कट करून त्यांना पलायन करण्यास भाग पाडण्यात आले. संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्कविषयक तपास दलाने हा अहवाल १४ ते २४ सप्टेंबर दरम्यान बांगलादेशात पोहोचलेल्या रोहिंग्यांशी केलेल्या चर्चेच्या आधारे तयार केला. त्यात एकूण ६५ लोकांशी चर्चा करण्यात आली. रोहिंग्या येथील रहिवासी नाहीत. त्यांनी गाव सोडून बांगलादेशला निघून जावे, अशी दवंडी पिटवून त्यानंतर सैन्याने हल्ले केले. दवंडीनंतरही काही लोक घरातून बाहेर पडले नाहीत. अशांची घरे पेटवून देण्यात आली. सैन्याने रोहिंग्या शिक्षक,संस्कृतीशी संबंधित व्यक्ती, नेत्यांना त्यात लक्ष्य बनवल्याचा दावा अहवालातून करण्यात आला. म्यानमारमधून बांग लादेशात लाखो रोहिंग्या घुसले आहेत.
धार्मिक सौहार्द रॅली
म्यानमारची राजधानी यांगूनमध्ये सत्ताधारी आँग सॅन स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीने रोहिंग्या मुस्लिमांविषयी धार्मिक सौहार्द वाढीस लागावे म्हणून मंगळवारी सायंकाळी एका रॅलीचे आयोजन केले होते. स्यू की स्टेडियममध्ये प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. कँडल मार्चमध्ये २० हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते.

Next Article

Recommended