आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्त राष्ट्राच्या सभेत १९५ देशांचे नेते एकत्र येणार, १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र - संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला पुढल्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. सिरिया, वातावरण बदल, दहशतवाद, घुसखोरी, कोरियातील तणाव इत्यादी मुद्दे आमसभेच्या चर्चेच्या केंद्रस्थानी असतील.

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. ही सभा २६ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स : अ युनिव्हर्सल पुश टू ट्रान्सफॉर्म अवर वर्ल्ड’ या संकल्पनेवर यंदाचे अधिवेशन आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांच्यासाठी ही सभा शेवटची ठरणार आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज २६ सप्टेंबर रोजी मार्गदर्शन करतील. २१ सप्टेंबर रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ मार्गदर्शन करतील. संयुक्त राष्ट्रासाठी यंदाचे वर्ष अत्यंत कठीण आहे. आफ्रिका, आशिया, युरोप, मध्य-पूर्वेत सातत्याने संघर्षाची स्थिती दिसून येत आहे. त्या प्रदेशांतील स्थिती सुधारण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न वाढवण्यात आले आहेत, असे संघटनेचे सरचिटणीस बान की मून यांनी म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ शनिवारी न्यूयॉर्ककडे रवाना झाले आहेत.

१२४ द्विपक्षीय बैठका
बान की मून यांची १२४ देशांसोबत द्विपक्षीय चर्चा होणार आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने मून ६२ कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...