अबुजा - आई... या एक शब्दांत अवघं विश्व समावलंय. पण केवळ जन्म दिल्यानंच कुणी आई होतं का... एखाद्या बालकाचा सुयोग्य सांभाळ करुन त्यात नवजिवन फुलवणारी आई होऊ शकत नाही का... जन्मदात्या आईनंच पोटच्या पोरांना ठार मारल्याच्या घटना दररोज घडताहेत. अगदी मुंबईत काल एक घटना घडली. जुहू सारख्या पॉश ठिकाणी राहणाऱ्या आईनं आपल्या तीन मुलांना ऊसाच्या रसातून विष दिलं. आता काय म्हणाल... कोणाला आई म्हणावं... निश्चितच जन्म देऊन किंवा जन्म न देताही बालकाचा योग्य सांभाळ करणारीच आई होऊ शकते... असेच काहीसे नायजेरीयात बघायला मिळाले आहे.
दोन वर्षांचा नायजेरियन मुलगा 'होप'ला त्याच्या आईने मरण्यासाठी रस्त्यावर सोडून दिले होते. हाताला मिळेल ते अन्न तो खात होता. लोकांच्या दयेवर जगत होता. अगदी श्वानासारखे त्याचे जीवन झाले होते. पण एका आईची (जन्मदात्या नव्हे) त्याच्यावर नजर पडली. त्याचे जीवन सुजलाम सुफलाम झाले.
आता त्याच्या तब्येतीत चांगलीच सुधारणा झाली आहे. भूकेने प्रचंड अशक्त झालेल्या 'होप'चे छायाचित्र जानेवारीत व्हायरल झाले होते. या छायाचित्रात डेन्मार्कची एंजा रिंग्रीन नावाची स्वयंसेवक त्याला पाणी पाजत आहे.
होपच्या शरीरात पडल्या होत्या अळया...
- 'होप'ला त्याचे कुटुंब राक्षस समजत होते. त्यांनी त्याला रस्त्यावर सोडून दिले होते.
- आफ्रिकेत राहणारी डेन्मार्कची स्वयंसेवक अॅंजा रिंग्रीन लोवेनला 31 जानेवारी रोजी एकेयात हा चिमुकला सापडला.
- त्या वेळी होपची स्थितीत बिघडली होती. तो कुपोषणाचा बळ ठरला होता आणि त्याच्या शरीरात अळया पडल्या होत्या.
- होप गेल्या 8 महिन्यांपासून भूक-तहानाने तडफडत रस्त्यावर भटकत होता. आसपासचे लोकही त्याला भूत समजून छळायचे. त्याला दगडही मारायचे.
- लोवेनने होपची अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यात त्याची स्थिती सुधारलेली दिसते.
- जगभरातील लोकांनी होपच्या महागड्या वैद्यकीय बिलांसाठी साडेसहा कोटी रुपये दान केले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कोण आहे अॅंजा.... बघा होपची छायाचित्रे...