आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unborn Baby Clapping In Womb As Parents Sing Nursery Rhyme

नर्सरी रायम ऐकून आईच्या गर्भात शिशूने वाजवल्या टाळ्या, बघा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
26 मार्च रोजी जेन कार्डिनल हिने गर्भात असलेल्या शिशूचा व्हिडिओ युट्यूबवर टाकला. तेव्हापासून या व्हिडिओला तब्बल एक लाख व्ह्यूज मिळाले आहेत. यासंदर्भात तिने सांगितले, की मी If You’re Happy And You Know It Clap Your Hands हे गाणे गुणगुणण्यास सुरवात केली तेव्हा माझ्या गर्भातील बाळ टाळ्या वाजवू लागले. यावेळी डॉक्टर सोनोग्राफी करीत होते.
त्यानंतर जेन कार्डिनल म्हणाल्या, की जरा वेळाने डॉक्टरांनीही गाणे म्हणण्यास सुरवात केली. तेव्हाही बाळ टाळ्या वाजवत होते. माझ्या पतीने या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रण केले. हा असा अनुभव होता जो मी कधीही विसरु शकणार नाही. माझ्या बाळाने तब्बल तीन वेळा टाळ्या वाजवल्या. खरंच हा अनुभव खुप विलक्षण होता.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा गर्भात टाळ्या वाजवणाऱ्या शिशूचा व्हिडिओ...आणि फोटो...