आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - इस्रायलच्या जेरुसलेम शहरात कब्रस्तानाची कमतरता भासत आहे. येथे दफनविधीसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जागेची कमतरता दूर करण्यासाठी सरकारने अंडरग्राउंड कब्रस्तान बनवण्याचे काम सुरू केले आहे. या अत्याधुनिक कब्रस्तानाची खोली तब्बल 15 मजली इमारत एवढी आहे. तर रुंदी चक्क 1.5 किमी आहे. वर्षभरात ते पूर्णपणे तयार होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
22 हजार कब्रींसाठी व्यवस्था
- या आधुनिक कब्रस्तानात 22 हजार कब्री बनवल्या जात आहेत. आतमध्ये जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे.
- 1.5 किलोमीटर लांब आणि 15 मजली इमारतींएवढी खोल असलेल्या कब्रस्तानात जाण्यासाठी 5 मोठ-मोठे प्रवेशद्वार आहेत.
- दोन वर्षांपर्यंतच्या या प्रकल्पासाठी सरकारने 325 कोटी रुपयांचा खर्च करण्याचे ठरवले आहे.
25 वर्षे भासणार नाही जागेची कमतरता
- विशेष म्हणजे, या अंडरग्राउंड कब्रस्तानानाचे काम इस्रायलचे सर्वात मोठे कब्रस्तान हामेनचॉटच्या खाली सुरू आहे. हामेनचॉट कब्रस्तानात 1.5 लाख कब्री आहेत.
- जेरुसलेम शहरात दरवर्षी सरासरी 4500 कब्रींची जागा लागते. त्यानुसार, एकदा हे नवीन कब्रस्तान तयार झाल्यास पुढची 25 वर्षे कब्रस्तानाची कमतरता भासणार नाही असा अंदाज आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या कब्रस्तानाचे आणखी काही फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.