आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unique Tradition Of Cave Dwellers Of Palestine In West Bank

केवळ परंपरेसाठी 100 वर्षांपासून गुहेत राहतो पॅलेस्टाइनमधील एक समुदाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुहेक राहणारे पॅलिस्टाइनच्या एका समुदायाचे लोक. - Divya Marathi
गुहेक राहणारे पॅलिस्टाइनच्या एका समुदायाचे लोक.
वेस्ट बँकमध्ये अजूनही अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या आपल्याला जुन्या काळाची आठवण करून देतात. मसाफर याट्टा येथील गावामध्ये जुन्या परंपरा कायम ठेवण्यासाठी पॅलेस्टाइनच्या सुमारे 1500 नागरिकांचा एक सुमदाय म्हणून आजही गुहेत राहतो. त्यांनी या गुहांमध्ये आपले कुटुंब स्थायिक केले आहे. ज्या गुहांमध्ये त्यांनी कुटुंब वसवले आहे, तेथे कोणताही विकास दिसून येत नाही. त्यांच्या गावापर्यंत पोहोचण्यासाठीही कोणताही रस्ता नाही. पाण्यासाठी ते दोन विहिरींवर अवलंबून आहेत. तर जनरेटरच्या माध्यमातून त्यांनी वीज मिळते.

मसाफर याट्टा च्या उम फकराहमध्ये राहणारे मेहमूद हुसेन हमामदी सांगतात की, आम्ही आजही आमच्या पूर्वजांसारखेच राहतो. अगदी साधे जीवन जगतो. शेती व्यवसाय करतो आणि आणि समुहातील लोकांची काळजी घेतो. इस्रायलच्या लष्कराने हे ठिकाण संरक्षित असल्याचे घोषित केले आहे. तसेच या भागात नव्याने बांधकामासही बंदी लादण्यात आलेली आहे. येथे जुनी घरेही अगदी मोजकी आहेत.

या समुदायांवर अभ्यास करणारे पॅलेस्टाइनचे अँथ्रोपॉलोजिस्ट आणि संशोधक एली क्लइबो यांच्या मते, 19 व्या शतकापर्यंत येरूसलेमच्या दक्षिण भागापासून बेर्शेबाच्या बाह्य भागापर्यंत सर्व गुहांमध्ये राहत असयाचे. क्लेइबो यांच्या मते ख्रिश्चन आणि मुस्लीम परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अशा गुहा अजूनही आहेत. त्यात हिब्रूनच्या इब्राहीमच्या गुहांपासून बेथलेहमच्या केव्ह ऑफ नेटिव्हीटी आणि डोम ऑफ रॉक च्या गुहांचा समावेश आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, गुहेत राहणाऱ्या पॅलेस्टाइनच्या समुदायाचे PHOTO