आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केट मिडल्टन यांना कन्यारत्न, ब्रिटनमध्ये जल्लोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - डचेस ऑफ केम्ब्रिज केट मिडल्टन यांना शनिवारी कन्यारत्न झाल्याने ब्रिटनमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांना पहाटेच आेटीपोटात कळा येत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. केनसिंग्टन महालातून त्यांना लंडनला हलवण्यात आले. ही बातमी काही तासांतच जगभरात पोहोचली. ब्रिटनच्या राजघराण्यात दुसरा पाहुणा येणार असल्याने नागरिकांना त्याची उत्सुकता लागली होती. त्यांची प्रसूती लिंडो विंग आॅफ सेंट मेरी रुग्णालयात झाली. केट आणि विल्यम यांना पहिला मुलगा आहे. त्याचा जन्म जुलै २०१३ मध्ये झाला. नव्या बाळाच्या स्वागतासाठी त्याचे डॅडी अर्थात प्रिन्स विल्यम लिंडो विंगमध्ये प्रसूतीच्या वेळी हजर होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसे झाले रॉयल बेबीचे स्वागत