आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टाफसाठी प्रवाशाला फरपटत नेऊन उतरवले; जबरदस्तीने उतरविणाऱ्या सुरक्षा रक्षकाचे निलंबन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिकागो- अमेरिकेने युनाएटेड एअरलाइन्सच्या विमानप्रवाशाला ओढून उतरविले आणि फरफटत नेले हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एअरलान्सने प्रवाशांची फक्त माफी मागितली आहे. प्रवाशाला जबरदस्तीने उतरविणाऱ्या सुरक्षा रक्षकाचे निलंबन करुन त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. शिकागोच्या ओ हेअर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाण क्र. ३४११ च्या  विमानात ही घटना घडली होती. यानंतर प्रवाशांनी या गर्दीच्या घाईच्या वेळेत विमानाचा बहिष्कार करण्याची धमकी दिली होती, तेव्हा कुठे शिकागो नागरी उड्डाण विभागाने कारवाई केली. 

विमान शिकागोहून लुइसविले येथे जात होते. यात एअरलाइन्सच्या स्टाफच्या चार कर्मचाऱ्यांनाही पाठवायचे होते. पण एकही जागा रिकामी नव्हती. एअरलाइन्सने नंतर सांगितले की, कोणीही चार लोकांनी उतरावे प्रत्येकाला ४०० डॉलर दिले जातील. पण कुणीच प्रवाशी उतरण्यास तयार नव्हते. तेव्हा रक्कम वाढविली गेली. ती ८०० डॉलर केली गेली. त्यानंतरही जेव्हा कोणी तयार झाले नाही. तेव्हा स्टाफने स्वत:च चार प्रवाशांना निवडले. त्यातील तीन प्रवासी उतरण्यावर कसेबसे संमत झाले. चौथा म्हणाला, मी डॉक्टर आहे माझे तिथे पोहोचणे गरजेचे आहे. स्टाफ नाराज झाला आणि त्यांनी त्या प्रवाशाला जागेवरून जबरदस्तीने उतरवून फरपटत नेत त्यांना उतरविले गेले.  
बातम्या आणखी आहेत...