आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाक धर्मगुरुंचा विमानात महिलेशेजारी बसण्यास नकार; वाचा- काय म्हणाली नाराज महिला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्यूस्टन- अमेरिकेतील ह्यूस्टनमध्ये यूनाइटेड एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये दोन पाकिस्तानी धर्मगुरुंनी गोंधळ घातला. प्रवासादरम्यान महिलेशेजारी बसणार नाही, असा धर्मगुरुंंनी प्रवित्रा घेतला होता. यामुुळेे एअरलाइन्स कंपनीने संबंधित महिलेला सीट बदलून दिल्याची घटना समोर आली आहे. पण, या सगळ्या प्रकारामुळेे महिला नाराज झाली आहे. तिनेे एअरलाइन्स कंंपनीला कोर्टात खेचले आहे.

या प्रकारामुळे नाराज झालेल्या महिलेने यूनाइटेड एअरलाइन्सला एक पत्र लिहून तिची खंत व्यक्त केली आहे. मेरी कॅंपस असे पीडित महिलेचे नाव असून ती ऑईल अॅण्‍ड गॅस कंपनीची सीनियर कंसल्टन्ट आहे.

मेरी यांनी पत्रात एक सवाल केला आहे. तो म्हणजे, 'फ्लाइटमध्ये सगळेेच क्रू मेंबर्स महिला असत्या तर पाकिस्तानी धर्मगुरुंनी काय केले असते?'

दरम्यान, वादावर पडदा टाकण्‍यासाठी ए‍अरलायन्स कंपनीने मेरी कॅंपस यांची माफी मागितली आहे. पण, मेरी यांनी एअरलाइन कंपीला कोर्टात खेचले आहे. कंपनीविरोधात मेरी यांनी खटला दाखल केला आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, महिला म्हणाली, कसला हा समाज? महिलांना व्हावे लागते वारंवार अपमानीत...
बातम्या आणखी आहेत...