आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Britain निवडणूक निकाल : मतदारांनी पुन्हा दाखवला कॅमरोन यांच्यावर विश्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निकालांनंतर जनतेला अभिवादन करताना कॅमरोन आणि त्यांची पत्नी. - Divya Marathi
निकालांनंतर जनतेला अभिवादन करताना कॅमरोन आणि त्यांची पत्नी.
लंडन - ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. रात्री उशीरा मतदान संपल्यानंतर मतमोजणीला सुुरुवात झाली. सध्या 650 पैकी बहुतांश ठिकाणचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये ब्रिटनच्या नागरिकांनी पुन्हा एकदा डेव्हीड कॅमरोन यांच्यावर विश्वास दाखवल्याचे चित्र आहे.
कोणाला किती जागा
पार्टी सीटें
काँझर्व्हेटिव्ह पार्टी 315
लेबर पार्टी 228
स्कॉटिश नॅशनल पार्टी 56
लिबरल डेमोक्रॅट्स 8
यूके इंडिपेंडेन्स पार्टी 1
इतर पक्ष 23
एक्झिट पोलमध्ये कॅमेरॉन यांना आघाडी
मतदान संपल्यानंतरच्या एक्झिट पोलमध्ये काँझर्व्हेिटव्ह पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. पंतप्रधान डेव्हीड कॅमरोन यांना स्पष्ट बहुमत मिळत नसल्याचे चित्र आहे. पण इतर पक्षांबरोबर हातमिळवणी करून ते पुन्हा एकदा सत्ता स्थापन करू शकतात. 650 जागांपैकी काँझर्व्हेटिव्ह पक्षाला 316 तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या लेबर पार्टीला 239 जागा मिळण्याची शक्यता आहे. बहुमतासाठी 326 जागांची आवश्यकता आहे.

गॉर्डन ब्राऊन यांच्या सरकारमध्ये मंत्री होते मिलिबँड
विरोधीपक्ष लेबर पार्टीचे अॅड मिलिबँड जिंकले तर ते ब्रिटेनचे पहिले नास्तिक पंतप्रधान असतील. आतापर्यंत या देशाचे सर्व पंतप्रधान हे ख्रिश्चन होते. टोनी ब्लेअर हे सर्वात जास्त धार्मिक आस्था असलेले पंतप्रधान असल्याचे मानले जात होते. मिलिबँड 17 व्या वर्षी लेबर पार्टीचे सदस्य बनले होते. 2005 पासून Doncaster North चे खासदार आहेत. मिलिबँड हे लेबर पार्टीचे नेतृत्व करणारे त्यांच्या कुटुंबातील 20 वे सदस्य आहेत. गॉर्डन ब्राऊन सरकारमध्ये ते ऊर्जा आणि पर्यावरण मंत्रीही होते. कमरोन 2001 पासून Witney येथील खासदार आहेत.

हाऊस ऑफ कॉमन्स (पार्लियामेंटचे लोअर हाऊस)
- 650 एकूण जागा
- 326 जागा बहुनतासाठी गरजेच्या

निवडणूक क्षेत्रानुसार जागा
533 – इंग्लंड
59 – स्कॉटलँड
40 – वेल्स
18 – नॉर्दर्न आयरलँड
पुढील स्लाइड्सवर पाहा, ब्रिटेनच्या निवडणुकीसी संबंधित PHOTO