आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचीन काळातच जन्मला असावा "अमर' मानव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - पुराणात अमरत्व प्राप्त झालेल्या महामानव आणि देव-देवतांच्या रंजक कथा ऐकावयास मिळतात. यात कितपत तथ्य आहे, याबद्दलची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात कायम घर करून राहिली असली तरी कदाचित हे सत्य मानण्याची वेळ आता आली आहे. कारण, केंब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनाचे निष्कर्ष अशा अमर मानवाच्या जन्माला पुष्टी देणारे आहेत.

मानवाला अमरत्व मिळू शकेल का, हा विषय यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वृद्धापकाळातील आजारापासून मुक्ती मिळवणाऱ्या पहिल्या मानवाचा जन्म कदाचित झाला असावा, असा दावा शास्त्रज्ञ करू लागले आहेत. मानवी जन्मानंतर हळूहळू वयोपरत्वे त्याच्यात शारीरीक व्याधी घर करू लागतात. वृद्धापकाळ तर कायम आजार घेऊन येतो आणि शेवटी मृत्यू हा मुक्तीचा मार्ग ठरतो. मात्र, वृद्धापकाळातील अशा आजारापासून मुक्ती मिळणारा माणूस अस्तित्वात आहे किंवा होता का, या प्रश्नावर तशी शक्यता खूप मोठी असल्याचे असे गेर्नोटोलॉजिस्ट अॅयुब्रे डिग्रे यांनी म्हटले आहे.

कॅलिफोर्नियातील स्ट्रॅटेजिक फॉर इंजिनिअरिंग निग्लिजिबल सिनसेन्स (एसईएनएस) रिसर्च फाउंडेशनचे सहसंस्थापक असलेल्या डिग्रे यांनी अमर मानवाच्या जन्माची शक्यता ८० टक्क्यांपर्यंत असल्याचे आहे. अमरत्व शब्दाच्या वापरापासून मुक्ती मिळवण्याचा आपला पहिला प्रयत्न आहे. या शब्दाचा वापर चुकीचाच नव्हे, तर हानिकारकही आहे, असे डिग्रे यांनी मदरबोर्ड वेबसाइटला सांगितले. याला आधार देताना ते म्हणतात,
कोणत्याही आजारापासून मृत्यू ओढवण्याची जोखीम शून्यावर येणे, असा या शब्दाचा अर्थ अभिप्रेत आहे. भारतीय प्राचीन इतिहासात अनेकदा एखादे व्यक्तिमत्त्व अमर ठरल्याच्या नोंदी सापडतात. मात्र, आजवर ही केवळ एक कल्पना किंवा तत्कालिक संकल्पना मानली जात होती.

अमरत्व ते असे...
मी वृद्धापकाळातील आजारावर संशोधन करत आहे. केवळ एकाच संशोधनातून सर्वच लोकांना अमरत्वाची संकल्पना पटेल असे नाही. मात्र, सर्वसाधारण वयोमानात ३० वर्षे वाढ होऊ शकते, हे या संशोधनाच्या दृष्टीने आशादायक आहे.
अॅयुब्रे डिग्रे, गेर्नोटोलॉजिस्ट