आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंका लष्करावर चालवा युद्ध गुन्ह्यांचा खटला, संयुक्त राष्ट्रांनी श्रीलंकेला सांगितले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिनिव्हा- श्रीलंकेने आपल्या लष्कराविरोधात कारवाई करावी, गृहयुद्धादरम्यान तामिळ नागरिकांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात खटले चालवावेत, या खटल्यांतील साक्षीदारांना सुरक्षा देण्यात यावी आणि पारदर्शी न्याय व्यवस्थेत आंतरराष्ट्रीय न्यायाधीशांनाही सहभागी करून घ्यावे, असे संयुक्त राष्ट्रांनी श्रीलंकेला सांगितले आहे.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त झैद राद अल-हुसेन यांनी आपल्या वार्षिक अहवालात श्रीलंकेकडे ही मागणी केली आहे. हा अहवाल मंगळवारी जारी करण्यात आला. त्यात म्हटले आहे की, श्रीलंकेच्या उत्तर-पूर्व भागातील गृहयुद्धात लष्कर तसेच तामिळ बंडखोर या दोघांनीही युद्ध गुन्हे केले आहेत. त्यामुळे त्यासाठी जबाबदार असलेल्या दोन्ही बाजूंविरुद्ध खटला चालवण्यात यावा.या अहवालावर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत बुधवारी विचार होईल. युद्धादरम्यान सुमारे ६५ हजार लोक बेपत्ता झाले होते तसेच २५० लोक अजूनही कायद्यानुसार संशयावरून तुरुंगात आहेत.
बातम्या आणखी आहेत...