आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्रात समोरासमोर आले जहाज, रशियाचा तुर्कीच्या बोटीवर गोळीबार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मास्को- रशियाने तुर्कस्तानच्या एका बोटीवर एजियन समुद्रात हल्ला चढवला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाने वॉरशिप स्मेतलाइव्हीहून तुर्कीच्या बोटीवर गोळीबार केला आहे. तुर्कीच्या बोटीला इशारा देण्यासाठी गोळीबार केल्याचा दावा रशियाने केला आहे. तुर्कीची एक बोट रशियाच्या वॉरशिप स्मेतलाइव्हीपासून 500 मीटर अंतरावर पोहोचली होती. त्यामुळे गोळीबार करावा लागल्याचेही रशियाच्या सूत्रांनी म्हटले आहे.

रशियाने दिलेली माहिती अशी...
- रशियाने याप्रकरणी तुर्कीच्या दूतावासला समन्स पाठवले आहे.
- रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, एजियन समुद्रात मच्छीमारांची एक बोट वॉरशिप स्मेतलाइव्हीपासून 500 मीटर अंतरावर पोहोचली होती. त्यामुळे तिच्या दिशेने गोळीबार करावा लागला.
- गोळीबार करताच तुर्कीच्या बोटीने बदलला मार्ग

यामुळे रशिया-तुर्कीत तणाव
-तुर्कीच्या एफ-16 फायटर प्लेनवर ‍रशियाने 24 नोव्हेंबरला 'एसयू-24 एअरक्राफ्ट' पाडल्याचा आरोप केला आहे.
- तुर्कीने सांगितले की, रशियाने एअरस्पेसच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.
- रशियाने तुर्कीचे सर्व आरोप फेटाळून लावले असून एसयू-24 सीरियन एअरस्पेसमध्ये होते, असा दावाही केला आहे. यावरुन दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
- रशिया व तुर्कीमध्ये सीरियावरून मागील काही वर्षांपासून वाद सुरु आहे.
- तुर्की, अमेरिका व फ्रान्स सोबत आहे. रशियाने ISISवर हल्ले केले आहे. परंतु सीरियाचे राष्ट्राध्यक्ष असद ISIS ला दर्शवला आहे.
- तुर्कीने रशियाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र, रशियाने तुर्कीवर अनेक इकोनॉमिक सेंक्शन्स लावले आहेत. यात इम्पोर्ट व ट्रॅव्हल्सचाही समावेश आहे.
- मागील आठवड्यात तुर्कीच्या मीडियाने रशियन सोल्जरच्या एक वॉरशिपवर रॉकेट लॉन्चर असलेले छायाचित्र प्रसिद्ध केले होते. यावरूनही दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

रशियाने आधीच दिला आहे तुर्कीला इशारा...
- वॉरप्लेन पाडल्यामुळे रशिया चांगलाच संतापला आहे. फायटर प्लेन पाडणे म्हणजे पाठीत खंजीर खुपण्यासारखे असल्याचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. दहशतवाद्यांना मदत करणार्‍या देशाने हे कृत्य केल्याचे सांगत पुतीन यांनी तुर्कीला इशारा दिला आहे.
- या घटनेमुळे रशिया व तुर्कीच्या संबंधांवर गंभीर परिणाम होणार आहे.
- 'अल्लाह ने फैसला कर लिया है। तुर्की को भुगतना तो पड़ेगा ही', असे मागील काही दिवसांपूर्वी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी संसदेत म्हटले होते.

रशियाने पाठवली आहेत मिसाइल क्रूझर
- ISIS च्या तळावर हल्ला करण्‍यासाठी रशियाने कॅस्पियन समुद्रात क्रूझर मिसाइल पाठवले आहेत.
- जर तुर्कीने रशियन एयरफोर्सला रोखण्‍याचा प्रयत्न केला तर रशियाचे मिसाइल क्रूझर अॅक्शनमध्ये येईल. तो रशियन फायटर प्लेनला कव्हर करणार आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, किती आहे रशियाच्या मिसाइल क्रूझरची ताकद...
बातम्या आणखी आहेत...