संयुक्त राष्ट्रे - दहशतवादी संघटन तहरिक-ए-तालिबान-पाकिस्तानचा म्होरक्या मुल्ला फजलुल्लावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने बंदी लादली आहे. पाकिस्तानमधील पेशावरच्या लष्करी शाळेवरील दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टरमाइंड आहे. तो रेडिओ मुल्ला नावानेही कुख्यात आहे.
सुरक्षा परिषदेने फजलुल्लाचे (४०) नाव प्रतिबंधित अतिरेक्यांच्या यादीत समाविष्ट केले आहे. यानंतर त्याची मालमत्ता जप्त होऊ शकते. त्याच्यावर प्रवास आणि शस्त्रबंदी लागू शकते. गेल्या महिन्यात ड्रोन हल्ल्याने तो गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आले होते. मात्र, त्याच्या मृत्यूला दुजोरा मिळू शकला नव्हता. अमेरिकेने जानेवारी महिन्यात फजलुल्लास आंतरराष्ट्रीय अतिरेकी जाहीर करून बंदी घातली होती.