दुसऱ्या महायुद्धाचे काही फोटोज प्रथमच उघड झाले आहेत. हे फोटो युद्धादरम्यान अमेरिकन मिलिटरीत जनरल असलेल्या अधिकाऱ्याने कॅमेऱ्यात कैद केली आहेत. ब्रिटीश न्यूज वेबसाइट डेलीमेलच्या वृत्तानूसार, जनरल चार्ल्स डे पामर यांनी वेस्टर्न फ्रंटसोबत असताना युद्धभूमीवरील विदारक दृष्य कॅमेऱ्यात कैद केले होते. अनेक वर्षे फायलींमध्ये बंद असलेली ही छायाचित्रे त्यांचे नातू डेनियल पामर यांनी नुकतीच सार्वजनिक केली आहेत. त्यांनी Argunners.com या साइटवर हे फोटो शेअर केले आहेत.
कोण आहे फोटोग्राफर
20 फेब्रुवारी 1902 मध्ये अमेरिकेच्या शिकागो येथे जन्मलेले जनरल पामर अमेरिकन मिलिटरी अॅकॅडमीमधून पासआऊट झाले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते वेस्टइंडिजमध्ये कार्यरत होते. वेस्टइंडिज तेव्हा ब्रिटीश वसाहत होती. पामर मिलिटरी बेस तयार करण्यापासून अँटी सबमरीन तयार करण्यापर्यंत काम करत होते.
इतिहासातील सर्वात मोठे युद्ध
जागतिक इतिहासातील सर्वात मोठे आणि भयावह युद्ध म्हणून दुसऱ्या महायुद्धाचा उल्लेख होतो. 1939 ते 1945 दरम्यान हे युद्ध सुरु होते, जवळपास 70 देशांचे 10 कोटींपेक्षा जास्त सैनिक या युद्धात सहभागी होते. या युद्धात पाच ते सात कोटी लोक मारले गेले असल्याचा एक अहवाल आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जनरल पामर यांनी टिपलेले निवडक PHOTOS...