आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK बनला दहशतवाद्यांचे नंंदनवन; दहशतवादी देश घोषित करा, अमेरिकेेत विधेेयक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- पाकिस्तानला दहशतवादी देश म्हणून घोषित करा, असे विधेेयक अमेरिकन संसदेत मंगळवारी मांडण्यात आले आहे. पाकिस्तान नेहमी भारताविरोधात घातपाती कारवाया करत आला आहे. दहशतवाद्यांना आश्रय देेणार्‍या पाकिस्तानला दिलेे जाणारे आर्थिक साहाय्य बंंद करायला हवा. पाकिस्तान दहशतवाद्यांचे नंदनवन बनला असल्याचा आरोप खासदार टेड पो यांनी केला आहे.

दुसरीकडे, यूएनमध्ये बराक ओबामा यांनी देखील पाकिस्तानचा नामोल्लेेख न करता खोचक शब्दात फटकारले आहे. एखाद्या देशाने दुसर्‍या देशाच्या विरोधात छुपे युद्ध (प्रॉक्सी वॉर) छेडले असेल तर ते आधी बंद करायला हवे, असे शब्दात ओबामा यांनी पाकचे कान पिळले आहे.

हाऊस ऑफ रिप्रेझेंंटेटिव्हमध्ये मांंडले विधेयक...
- हाऊस ऑफ रिप्रेझेंंटेटिव्ह रिपब्लिकन पक्षाचे खासदार टेड पो यांच्यासह खासदार डाना रोहराबेकर यांनी 'पाकिस्तान स्टेट स्पॉन्सर ऑफ टेररिझम डेजिगनेशन अॅक्ट (HR 6069)' विधेयक मांंडले.
- खासदार टेड पो हे हाऊस ऑफ रिप्रेझेंंटेटिव्ह टेररिझम बनलेल्या समितीचे चेअरमन आहेत.
- पो यांनी दिलेली माहिती अशी की, 'पाकिस्तान नेहमी भारताविरोधात घातपाती कारवाया करत आला आहे. पाकिस्तानला दिलेे जाणारे आर्थिक साहाय्य बंंद तत्काळ करायला हवे.'
- पाकिस्तानवर आता विश्वास ठेवणे म्हणजे मूर्खपणा होईल, पाक अनेक वर्षांपासून अमेरिकेच्या शत्रूंंना आश्रय दिला असल्याचे पो यांनी म्हटले आहे.
- पो यांनी जम्मूू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेेध केला. या हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झाले आहे. भारत हे अमेरिकेचे मित्रराष्ट्र आहे.
- अमेरिकेचा शत्रू ओसामा बिन लादेन याला देखील पाकने आश्रय दिला होता, असा आरोप देखील पो यांनी केला आहे. दहशतवाद्यांना पाक कशाप्रकारे मदत करत आहे, हे आता जगजाहीर झाले आहे.
- बराक ओबामा यांना संंसदेत मांंडण्यात आलेल्या विधेयकावर पुढील 90 दिवसांत आपले मत सादर करावे लागणार आहे. पाकिस्तान, इंटरनॅशनल टेररिझमचे समर्थन करतो की नाही, याबाबत बराक ओबामा यांना संंसदेत स्पष्टीकरण दावे लागणार आहे.

ओबामांचे अखेरच्या भाषणात पाकिस्तानचे पिळले कान...
-अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी संयुक्त राष्ट्रसंघातील आपल्या शेवटच्या भाषणात पाकला इशारा दिला. छुपे युद्ध बंद करावे, असेही सुनावले.
- जर्मनीचे परराष्ट्र मंत्री फ्रँक वॉल्टर म्हणाले, पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याचा भारताला संपूर्ण अधिकार आहे.
- नोव्हेंबरमध्ये पाकमध्ये होत असलेल्या सार्क शिखर परिषदेवर भारत, अफगाणिस्तान बांगलादेशाने बहिष्कार टाकला.

दरम्यान, पाकिस्तानविरोधात जगभरात अनेक प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. 18 सप्टेंंबरला जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरध्ये लष्कराच्या छावणीवर दहशतवादी हल्ला झाला होता. हल्ल्यात 18 जवान शहीद झाले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशीच पाकिस्तानने भारतीय चौक्यांवर केलेल्या गोळीबार केला. गोळीबार सुरु असताना दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केली. भारतीय लष्कराने चोख उत्तर देत 10 दहशतवाद्यांचा खात्मा केला. दबा धरून बसलेले त्यांचे पाच साथीदार थांबून थांबून भारतीय सैनिकांवर गोळीबार करत होते.

दुसरीकडे, हंदवाडाच्या नौगाम सेक्टरमध्ये आणखी एक घुसखोरीचा प्रयत्न झाला. अतिरेक्यांनी ग्रेनेडने हल्ले केले. त्यात एक भारतीय सैनिक शहीद झाला आहे.

पुुढील स्लाइडवर वाचा, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान असा एकटा पडू लागला...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...