आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Air Force Reveals Its Top Secret $100bn B 21 Stealth Bomber

अमेरिकेने पहिल्यांदा जारी केले बी-21 बॉम्बरचे फोटो, जगात कुठेही डागले जाऊ शकतात बॉम्ब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - यूएस एअरफोर्सने आपल्या सर्वात टॉप सीक्रेट नेक्स्ट जनरेशन बी-21 स्टील्थ बॉम्बरचा पहिला फोटो जारी केली आहे. शीतयुद्धा दरम्यानच्या बी-52 बॉम्बरची ते आता जागा घेणार आहे. जगात कुठेही हवाई हल्ला करण्यात हे बॉम्बर यशस्वी होईल असे त्याचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. याच्या निर्मीतीत 100 बिलियन डॉलर (सहा लाख 31 हजार कोटींपेक्षा जास्त) खर्च आला आहे.
कोणत्याही रडारच्या तावडीत सापडणार नाही बी-21...
- हे बॉम्बर झिगझॅग शेपमध्ये असेल आणि शत्रुंच्या रडारलाही याचा पत्ता लागणार नाही.
- पूर्वी यास लॉन्ग रेंज स्ट्राइक बॉम्बर(एलआरएस-बी) नावाने ओळखले जाते. आता यास बी-21 नाव देण्‍यात आले आहे.
- यूएस एअरफोर्समध्‍ये 21 व्या शतकातील हे पहिले बॉम्बर असेल.
- सध्‍या याबाबत सर्व माहिती उघड करण्‍यात आलेली नाही. पुढील महिन्यांमध्‍ये यावरुन पडदा उठण्‍याची शक्यता आहे.
- हे वॉर प्लेन हायटेक कम्युनिकेशन्स सिस्टिमने सज्ज असेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
- हे बी-52 ची जागा घेणार आहे. या व्यतिरिक्त बी-1 बॉम्बर्सची जागा घेईल.