आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US America Weather Winter Snowstorm Updates 25 Jan 2016

USA:\'स्नोजिला\'चे 29 बळी; तीन दिवसांत 4 फूट बर्फ, पर्यटकांचाही खोळंबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेतील हिमवादळानंतर अनेक शहरे बर्फमय बनली आहेत. महामार्गावर बर्फ साचल्यामुळे गाड्या ठप्प झाल्या आहेत. वॉशिंग्टनमध्ये बर्फाचा 4 फूट थर पाहायला मिळाला. त्यामुळे वाहनचालकांचे हाल झाले. पोलिसांनाही आपल्या गाड्या बर्फातून ढकलत बाहेर काढाव्या लागल्या. अमेरिकेची राजधानी ठप्प झाल्याने शेकडो पर्यटकांचाही खोळंबा झाला आहे.

अमेरिकेत आलेल्या 'स्नोजिला' या वादळाने आतापर्यंत 29 बळी घेतले आहेत. अमेरिकेच्या हवामान विमागाने दिलेल्या माहितीनुसार, 'स्नोजिला'पासून सोमवारी देखील दिलासा मिळू शकला नाही. हिमवर्षाव व थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी रात्री 42 इंच हिमवर्षावाची नोंद झाली.

कुठे किती झाला स्नोफॉल?
- वॉशिंग्टनमधील नार्थवेस्टमध्ये वेस्ट व्हर्जीनियामध्ये 42 इंच हिमवर्षावाची नोंद झाली.
- न्यूयार्क जॉन एफ. केनेडी इंटरनॅशनल एअरपोर्टवर 31 इंच, बॉल्टीमोर/वाशिंग्टन इंटरनॅशनल एअरपोर्टवर 29.2 इंच तसेच वॉशिंग्टन डल्लास इंटरनॅशनल एअरपोर्टवर 28 इंच, न्यू जर्सीमध्ये 28 इंच, न्यूयार्क सेंट्रल पार्कमध्ये 26.8 इंच व फिलाडेल्फियामध्ये 22 इंच हिमवर्षावाची नोंद झाली आहे.
- हिमवर्षावामुळे आतापर्यंत 8 हजाराहून जास्त फ्लाइट्स रद्द करण्‍यात आल्या आहेत.
- अमेरिकेतील 22 राज्यांना 'स्नोजिला'चा सर्वाधिक फटका बसला आहे. यामुळे सुमारे 8 कोटी लोक प्रभावित झाले आहेत.
- अमेरिकेत आलेल्या स्नोजिलाचा जपानवर देखील परिणाम झाला आहे.

आतापर्यंत 29 जणांनाचा मृत्यू
- स्नोजिला हिम वादळाने आतापर्यंत 29 जणांचा बळी घेतला आहे.
- ताशी 75 किलोमीटर वेगाने आलेल्या हिम वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
- सोमवारी सकाळी हिमवादळ आणखी धोकादायक झाले. यामुळे सरकारी कार्यालये व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. सर्वात आधी रोड क्लीयर करण्याचे काम सुरु आहे.

1922 मध्ये आले होते अशाच प्रकारचे हिमवादळ...
- अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेला यापूर्वी 1922 मध्ये अशाच प्रकारच्या हिमवादळाचा तडाखा बसला होता. दोन दिवसांत 28 इंच हिमवर्षाव झाला होता.

शुक्रवार ते शनिवारदरम्यान 8,835 फ्लाइट्स रद्द...
- वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे नॉर्थ कॅरोलिनमध्ये 1,00,000 पेक्षा जास्त घरांमध्ये अंधार आहे.
- जॉर्जिया, टेनेसी, पेंसिलवेनिया, मेरीलंड, केंचुकी, नॉर्थ कॅरोलिन, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, व्हर्जीनिया व वेस्ट व्हर्जीनियामध्ये आपातकालीन स्थिती, तर वॉशिंग्टनमधील डी.सी.मध्ये 'स्नो इमरजन्सी' जाहीर करण्‍यात आली आहे.
- न्यू जर्सीच्या बर्नीगेट टाउनशिपमध्ये पोलिसांनी 'फेसबुक'च्या माध्यमातून कोस्टल एरियापासून लांब राहण्याचा इशारा दिला आहे. हिम वादळ उग्ररुप धारण करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
- फिलाडेल्फियामध्ये कोड ब्लू इश्यू घोषित करण्‍यात आला आहे.
- नॉर्थ कॅरोलिनामध्ये शुक्रवारी रात्री दोघांचा मृत्यू झाला.
- व्हर्जीनियाच्या पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री 989 गाड्या घसरल्या. त्याचप्रमाणे 793 गाड्या बर्फात फसल्या आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, अमेरिकेतील हिमवादळाची फोटोज...