आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेने उत्तर कोरियाच्या सीमेवर उतरवले शेकडो लढाऊ विमान, असा होता नजारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल - उत्तर कोरियाने लांब पल्ल्याचे मिसाइल टेस्ट घेतल्याच्या 6 दिवसानंतर अमेरिकेने दक्षिण कोरियासोबत संयुक्त युद्ध सराव सुरू केला. उत्तर कोरियाच्या सीमेजवळच सुरू झालेल्या या संयुक्त युद्ध सरावात अमेरिकेने आपल्या ताकदीचा नमुना दाखवला. तसेच नॉर्थ कोरियाच्या सीमेवर एक दोन नव्हे, तर तब्बल 230 लढाऊ विमान उतरवले. अमेरिकेचे 16 हजार सैनिक दक्षिण कोरियाचे 1 लाख सैनिक या सरावात सहभागी झाले आहेत.

 

रडारमध्ये सापडणार नाहीत हे लढाऊ विमान
> दक्षिण कोरियात अमेरिकेचे जवळपास 29 हजार सैनिक तैनात आहेत. शेजारील शत्रू राष्ट्र उत्तर कोरियाने हल्ला केल्याच्या परिस्थितीत ते प्रत्युत्तर देतील. हे सगळेच सैनिक आपल्या कुटुंबियांसह दक्षिण कोरियात आहेत. 
> दक्षिण कोरियाचे 1 लाख सैनिक या संयुक्त युद्ध सरावात सहभागी झाले आहेत. त्यामध्ये नौदलच्या सैन्यांचा देखील समावेश आहे. 
> याच सरावात अमेरिकेने आपले 24 अत्याधुनिक एफ-22 रॅप्टर विमान सुद्धा उत्तर कोरियाच्या सीमेजवळ लॅन्ड केले आहेत. हे विमान शत्रूच्या रडारमध्ये सापडत नाहीत. 
> चितावणीखोर उत्तर कोरियाला डिवचण्यासाठी दरवर्षी अमेरिका दक्षिण कोरियासोबत संयुक्त युद्ध सराव करत आला आहे. अनेकवेळा यात जपानला सुद्धा सहभागी करून घेण्यात आले.
> या सरावावर उत्तर कोरिया पुन्हा भडकला आहे. तसेच हल्ला झाल्यास त्याला अमेरिकाच जबाबदार राहील असा इशारा दिला. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...