आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Asks Pakistan To Take Action Against Terrorist Groups Involved In Pathankot Attack

अमेरिकेने म्‍हटले - पाकने दहशतवादी गटांवर तत्‍काळ कारवाई करावी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- दहशतवादाचा नायनाट करण्‍यासंदर्भात पाकिस्‍तानने जगाला जी आश्‍वासनं दिली ती पाळावी असा सल्‍ला अमेरिकेने दिला आहे. अमेरिकेच्‍या विदेश मंत्रालयातील एका अधिका-याने म्‍हटले की, पाकिस्‍तानने पठाणकोट हल्‍ल्याला जबाबदार असलेल्‍या दहशतवादी गटावर तत्‍काळ कारवाई करावी. भारताने या हल्‍ल्यासंदर्भात ठोस पुरावे द्यावे असेही एका अधिका-याने म्‍हटले आहे.
मुंबई हल्‍ल्यासारखा प्रकार चालणार नाही..
- मीडिया रिपोर्टनुसार, पठाणकोट हल्‍ल्याबाबत एका अमेरिकेतील अधिका-या मत पुढे आले आहे. मात्र त्‍याचे नाव पुढे आले नाही.
- या अधिका-याने पाकिस्‍तानला दम देत म्‍हटले की, मुंबई हल्‍ल्याच्‍या वेळी केला होता, तसा बहाणा आता चालणार नाही.
- दहशतवाद संपवण्‍यासाठी पाकने केलेली आश्‍वासने पाडावी, असेही हा अधिकारी म्‍हणाला.
पाकिस्तानने म्‍हटले - भारताने ठोस पुरावा द्यावा..
- एका पाकिस्‍तानी अधिका-याने शनिवारी म्‍हटले की, दहशतवादी गटांवर कारवाई करण्‍यासाठी भारताने ठोस पुरावे द्यावे.
- पाकिस्तानी वृत्‍तपत्र ‘द डॉन’ सोबत बोलताना हा अधिकारी म्‍हणाला, “आम्‍हाला संकेत नाही, ठोस पुरावे हवे आहेत. त्‍यानंतर पाकिस्‍तान कायद्यानुसार दहशतवाद्यांवर कारवाई करेल.”
- पठाणकोट हल्‍ल्यासंदर्भात भारताकडून दबाव वाढल्‍यानंतर नवाझ शरीफ आणि इतर अधिका-यांमध्‍ये बैठका होत आहेत.
सरताज अजीज म्‍हणाले - 15 जानेवारीला होईल चर्चा..
- नवाझ शरीफ यांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजीज शनिवारी म्‍हणाले, दोन्‍ही देशांचे परराष्‍ट्र सचिव 15 जानेवारीला इस्लामाबादमध्‍ये चर्चा करणार आहेत.
-आयएनएस या वृत्‍तवाहिनीच्‍या माहितीनुसार, अजीज म्‍हणाले, या चर्चेत ठरलेल्‍या विषयांवरच चर्चा होईल. त्‍यामध्‍ये काश्‍मिरचा मुद्दाही आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..